ETV Bharat / state

Shiv Sena's Ultimatum : शिवबंधन बांधण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंना अल्टीमेटम - शिवबंधन बांधण्याची

राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी (For the seventh seat of the Rajya Sabha) छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवबंधन बांधण्याची (build Shivbandhan) अट शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा कायम ठेवली आहे. शिवसेनेने त्यांना सोमवार दुपारी 12 वाजेपर्यंत आपला निर्णय (Shiv Sena's ultimatum) कळवण्याचे सांगितल्याचे समोर येतआहे.

Thackeray - Sambhaji Raje
ठाकरे - संभाजीराजे
author img

By

Published : May 22, 2022, 8:28 PM IST

Updated : May 22, 2022, 8:35 PM IST

मुंबई: छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर उद्या संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवबंधन बांधूनच राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा आदेशवजा निरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना रविवारी दुपारी पाठवला. मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी ओबेराय हॉटेलमध्ये जाऊन, ठाकरेंचा निरोप संभाजीराजेंना एकविला. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनीही शिवबंधनाची अट असल्याचे संभाजीराजेंच्या कानावर घातले. त्यानुसार संभाजीराजेंनी सोमवारी दुपारी 12 पर्यंत शिवबंधन बांधावे यावर ठाकरे ठाम आहेत.

संभाजीराजेंनी शिवसेनेची अधिकृत उमेदवारी स्वीकारणार नसल्याचे आधी जाहीर केले असले तरी आता ठाकरेंच्या भूमिकेवर ते काय प्रतिसाद देणार यावर पुढीस घडामोडी अवलंबून आहेत. ठाकरेंच्या अटी धुडकाणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत करण्याची तयारी शिवसेनेची असल्याची चर्चा पसरली. नंतर लगेचच काही मिनिटांतच संभाजीराजें थांबलेल्या हॉटेलमध्ये सामंत, देसाई आणि नार्वेकर दाखल झाले आणि शिवबंधनसाठी निमंत्रण दिले.

संभाजीराजे द्विधा मन:स्थितीत राहिल्याने शिष्टमंडळाने थेट संजय राऊत यांना फोन लावला. राऊत यांनीही मग संभाजीराजेंना ठाकरेंची भूमिका समजावून सांगितली. मात्र, उमेदवारी अर्जावर अपक्ष म्हणूनच उल्लेख करण्यावर संभाजीराजे कायम असल्याचे सध्याचे चित्र आहे. राजेंचा प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज होऊन सामंत, देसाई आणि नार्वेकर या तिघांनीही ओबेरायमधून त्यांचा निरोप घेतला आणि पुन्हा ठाकरेंच्या भेटीला गेले.

संभाजीराजे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढची पावले उचलणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु ठाकरे आपल्या भूमिकेपासून एकही पाऊल मागे यायला तयार नसल्याचे तूर्त दिसत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका पवार यांनी या आधीच जाहीर केली असल्याने तेथेही सेनेचा शब्द अंतिम ठरणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : Sanjay Raut Criticized BJP : 'हिंमत असेल तर दाऊदला फरफटत घेऊन या'

Last Updated : May 22, 2022, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.