ETV Bharat / state

मोफत कोरोना लस हा भाजपाचा 'चुनावी जुमला' - शिवसेनेचा चिमटा - प्रियांका चतुर्वेदी लेटेस्ट न्यूज

बिहार निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आज भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र, त्यावर आता देशभरातून टीकेची झोड उठत आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विट केले आहे.

Priyanka Chaturvedi
प्रियांका चतुर्वेदी
author img

By

Published : Oct 22, 2020, 4:04 PM IST

Updated : Oct 22, 2020, 4:24 PM IST

मुंबई - बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपण सत्तेत आल्यास बिहारमधील नागरिकांना कोरोनावर मोफत लस दिली जाईल, असे वक्तव्य केले आहे. यावर सर्व देशभरातून टीका केली जात आहे. सर्व राज्यातील नागरिकांची जबाबदारी केंद्र सरकारची नाही का? असा प्रश्न शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.

  • वैक्सीन आयी नहीं है अब तक पर चुनावी जुमलों का हिस्सा ज़रूर बन गयी है।
    क्या केंद्र सरकार की ज़िम्मेदारी सारे राज्यों के लोगों के लिए एक समान नहीं होनी चाहिए?

    — Priyanka Chaturvedi (@priyankac19) October 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशभरात कोरोनाचा प्रसार झाला असतानाही बिहार विधासनभेची निवडणूका होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज भाजपाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी त्या म्हणाल्या, एनडीए सरकार यशस्वीपणे कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाच्या अनेक लसींच्या विविध स्तरांवर चाचण्या सुरू आहेत. आयसीएमआर ज्या कोरोना लसीला परवानगी देईल, ती लस बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात येईल. कोरोनाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात तिचे उत्पादन घेण्यात येईल. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत मिळणार असे भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. मात्र, देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देणार का, याबाबत भाजपाने काहीही माहिती दिलेली नाही.

केंद्रात सत्ता आहे म्हटल्यावर देशातील प्रत्येक राज्य आणि प्रत्येक नागरिक हा भाजपासाठी समान असायला पाहिजे. मात्र, एकाच राज्यातील लोकांवर जास्त उदार होणे, हे केवळ निवडणुकी पुरते आहे का? असा संशय इतर पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाच्या या घोषणेमुळे विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र्रात सत्तेत असलेल्या व भाजपाचा कट्टर विरोधक बनलेल्या शिवसेनेनेही भाजपावर टीका केली आहे. लस अजून आली नाही. परंतु ही लस आता चुनावी जुमला बनली आहे. देशातील सर्व राज्यातील नागरिकांची जबादारी केंद्र सरकारची नाही का? असा प्रश्न शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार व प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे. देशातील सर्व राज्यातील नागरिकांची जबाबदारी एकसमान असली पाहिजे असेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

Last Updated : Oct 22, 2020, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.