मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) अखेर आज बुधवार (दि. ९ नोव्हेंबर)रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बाहेर पडले आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर आणि अडथळ्यानंतर राऊत बाहेर येत असल्याने कार्यकर्त्यांते मोठ्या संख्येने उपस्थित आहे.
राऊत यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला - शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना मुंबईतील पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. पत्राचाळ जमीन घोटाळ्याच्या आरोपाखाली राऊत दीर्घकाळ तुरुंगात होते. सुटकेचा आदेश मिळाल्यानंतर राऊत सायंकाळी उशिरा कारागृहातून बाहेर आले.