ETV Bharat / state

ईडी हे भाजपचे उपकार्यालय, अरविंद सावंत यांचा घणाघात - ED Raid on MP Anandrao Adsul

आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर शिवसेना नेत्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. यात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ईडी हे भाजपचे उपकार्यालय असल्याचे म्हटलं आहे.

shiv sena mp arvind sawant criticized bjp for ED Raid on Shiv Sena Former MP Anandrao Adsul
ईडी हे भाजपचे उपकार्यालय, अरविंद सावंत यांचा घणाघात
author img

By

Published : Sep 27, 2021, 10:16 PM IST

मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारवर ईडीमार्फत कारवाईचे धाड सत्र सुरू आहे. ईडीचा राजकीय वापर करण्यात येत आहे. ईडी हे भाजपचे उपकार्यालय आहे, असा घणाघात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी चढवला. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनेला बदनाम करण्याचे कट कारस्थान असल्याचे सांगत, सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

ईडीची चौकशी
शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील ९०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीमार्फत चौकशी केली जात आहे. आज शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी पोहचले. तब्बल ४ तासांहून अधिक काळ अडसूळ यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान आनंद अडसूळ यांची तब्येत बिघडल्याने गोरेगाव येथील लाईफ लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ईडीच्या कारवाईनंतर शिवसेना नेत्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.

ईडी हे भाजपचे उपकार्यालय
यंत्रणांचा राजकीय वापर सुरू आहे. ईडीचा राजकीय वापर करण्यात येत आहे. ईडी हे भाजपचे उपकार्यालय आहे, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना न्याय मिळाला पाहिजे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत इतर बँकांचे बोला. शिवसेनेला बदनाम करण्याचे कारस्थान करण्यात येत आहे. अनिल परब हे ईडीच्या चौकशीला सामोरे जातील त्यांच्यात ती क्षमता आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात देशातील भ्रष्टाचाराचा कळस आहे तिथे त्यांची सत्ता आहे. त्यामुळे तिथे कारवाई होत नाही, असेही सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थ आहेत. रवी राणा यांच्यावर आरोप आहेत. रवी राणाने बीएसएनएलची जमीन हडप केली आहे. नवनीत राणा या सुप्रीम कोर्टात केस पराभूत होत आल्यात त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहेत. आनंदराव अडसूळ हा छातीवर वार घेतलेला माणूस आहे. सोमय्यांनी यांनी यापूर्वी कोकणातल्या नेत्यावर केलेल्या आरोपाचे काय झाले, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

अमित शाह म्हणजे गजनी
भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत, अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ‘मैने ऐसे कोई बोला नही था’, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असेल, पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याचे काम करणारे आमचे नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा. तसेच शिवसेना-भाजपच्या युतीबाबत काय घडले होते, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा - Gulab Cyclone : 'गुलाब' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसणार, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

हेही वाचा - मुंबई : खड्डे पाहून पेडणेकर बाईंचा चढला पारा; अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.