ETV Bharat / state

मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या आमदारांचे जोरदार लॉबिंग - संजय राठोड यांचा राजीनामा

रिक्त झालेल्या पदासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. आमदार रविंद्र वायकर, संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया यांची नावे यात आघाडीवर आहेत. गेल्यावेळी रवींद्र वायकर नाराज होते. मात्र, आता मंत्रिपदासाठी त्यांनीही उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.

shiv-sena-mlas-lobbying-for-ministerial-posts
मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या आमदारांचे जोरदार लॉबिंग
author img

By

Published : Mar 1, 2021, 6:26 AM IST

मुंबई - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. आमदार रविंद्र वायकर, संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया यांची नावे यात आघाडीवर आहेत. गेल्यावेळी रवींद्र वायकर नाराज होते. मात्र, आता मंत्रिपदासाठी त्यांनीही उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. तर विदर्भाचे दिग्गज नेते सलग तीन वेळचे मेहेकरचे आमदार संजय रायमुलकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रिपदासाठी लॉबिंग -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजीनामा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी सध्या हे खाते त्यांच्याकडे ठेवले आहे. मात्र, विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री किंवा राज्य मंत्र्यांकडून उत्तरे दिली जाईल. असे असले तरी शिवसेनेच्या काही नेत्यांनी या पदासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.

लॉटरी कोणाला लागणार -

शिवसेनेचे माजीमंत्री रवींद्र वायकर, संजय रायमुलकर आणि गोपी किशन बजोरिया यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. त्यापैकी रवींद्र वायकर हे उपनगरातील शिवसेनेचे खंदे समर्थक मानले जातात. तर संजय रायमुलकर सलग तीन टर्म निवडून आले आहेत. शिवसेनेची विदर्भात मोठी ताकद आहे. गोपीकिशन बाजोरियादेखील शिवसेनेचा आक्रमक चेहरा मानला जातो. यामुळे तीन आमदारांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे येत्या काही दिवसात समोर येईल.

राठोड यांना क्लीन चिट मिळणार? -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. पोलीस तपासात राठोड यांचे नाव अद्याप समोर आलेले नाही. पूजा चव्हाणच्या पालकांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई करू नका, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेचे कोंडी होऊ नये, याकरिता राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला आहे. मात्र, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ते निर्दोष सिद्ध झाल्यास त्यांच्याकडे पुन्हा वनमंत्री खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.