ETV Bharat / state

Shiv Sena Dasara Melava : ...मग महाराष्ट्रातील भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता..संजय राऊत यांची महायुतीवरून भाजपावर टीका - शिवसेना

Shiv Sena Dasara Melava : शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा मंगळवारी मुंबईत पार पडला. या दसरा मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

Shiv Sena Dasara Melava
खासदार संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 8:17 AM IST

मुंबई Shiv Sena Dasara Melava : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत ( Sanjay Raut On Dasara Melava ) यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर बोचरी टीका करत निशाणा साधला. शिवतीर्थावर इथं मराठा तितुका मेळवावा सुरू असून तिकडं मराठा तितुका लोळवावा, असं सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. आगामी काळात राज्यात आणि केंद्रातही ठाकरे सरकार येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात व्यक्त केला.

केंद्र सरकारला इशारा, हिम्मत असेल तर टक्कर घ्या : संजय राऊत म्हणाले, ठाकरे सरकार महाराष्ट्रात आणि दिल्लीतसुद्धा येणार आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर त्यांनी टक्कर घ्यावी, असे आव्हान संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारला दिले. डुप्लिकेट चायनीज माल येतो आणि जातो. राज्याच्या अभिमान आणि सन्मानाला नख लावण्याचं काम केलं जातं आहेत. आपण शंभर दिवस जेलमध्ये असल्यानंतरही बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून तुटलो नाही, की मोडलो नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुम्हाला घाबरणार नसल्याचा इशाराही संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना यावेळी दिला आहे.

महाराष्ट्रातील भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर का घेता : भाजपा मला तुरुंगात टाकायला निघाले होते, मीच भाजपात गेलो आणि ईडीची फाईल बंद झाली, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. देशाचे पंतप्रधान दररोज भ्रष्टाचारी को छोडूंगा नही, सबको पकड पकड के उलटा करुंगा, असं सांगतात. मात्र महाराष्ट्रात सिंचन घोटाळा करणाऱ्यांनाच सत्तेत सामील करतात, अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष आहे. भाजपाच्या ढोंगीपणाचं मला आश्चर्य वाटत आहे. येत्या काळात पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. छत्तीसगडमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी भ्रष्टाचाऱ्यांना उलट लटकवणार असल्याचं सांगितलं. मग महाराष्ट्रातील भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेताय, असा सवाल संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला आहे. भ्रष्टाचाराची भाषा करताय, तर त्या चाळीस गद्दारांना उलटं लटकवा. आम्ही तुमचा शिवतीर्थावर सत्कार केल्याशिवाय राहणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांनी मोठा घोटाळा केल्याचं सांगितलं होतं. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार भाजपासोबत सत्तेत बसले. दाऊद आणि भाजपा भाऊ- भाऊ झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे. एकनाथ शिंदे गटात गेलेले सर्वांच्या दारावर ईडीचं वारंट चिटकवलं आहे. त्यामुळे ते सगळे भाजपासोबत गेले आहेत. महाराष्ट्र लुटण्याचा काम हे सरकार करत आहे. भाजपा सरकार वाघनख्यांचा घोटाळा करत आहेत. 16 नोव्हेंबरला महाराष्ट्रात वाघनखं येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागतच करू. महाराष्ट्रातील खरी वाघनखं लाखोंच्या संख्येनं आमच्या समोर बसली आहेत. ती 2024 ला तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणल्याशिवाय राहणार नाही, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Shinde Group Dasara Melava : '५० खोक्यांचा आरोप करून आम्हालाच ५० कोटी मागता, तुम्ही निर्लज्ज...', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
  2. Uddhav Thackeray Dasara Melava : मराठा समाजावर लाठीचार्जचा आदेश देणारा डायर कोण? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.