ETV Bharat / state

मुंबईतील पावसाळी कामांसाठी आचारसंहिता शिथिल करा; सुधार समितीत मागणी - लोकसभा निवडणूक

मुंबईत पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबते. पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. त्यामुळे पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे केली जातात. यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात दिलासा देता यावा म्हणून आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी पालिकेच्या सुधार समितीत करण्यात आली आहे.

सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब
author img

By

Published : May 16, 2019, 11:49 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू असल्याने मुंबईमधील नालेसफाई आणि विकासकामे रखडली आहेत. मुंबईकरांना सोयी-सुविधा देण्याच्या कामातही आचारसंहिता लागू असल्याची कारणे प्रशासनाकडून दिली जात आहेत. यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात दिलासा देता यावा म्हणून आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी पालिकेच्या सुधार समितीत करण्यात आली आहे.

सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब बोलताना...

मुंबईत पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबते. पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. त्यामुळे पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे केली जातात. या कामांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक लक्ष ठेवून असतात. मात्र, यावर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने ही कामे संथ गतीने सुरु आहेत. याचा परिणाम पावसाळ्यात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यात दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल होऊ शकते. तर मुंबईकरांना सोयी सुविधा आणि सुरु असलेली कामे करायला आचारसंहिता का शिथिल होऊ शकत नाही, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे. २०१४ मध्ये निवडणूकीसाठी मतदान झाल्यावर आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती. या संबंधीचे निर्णय बैठकीत सादर करुन पालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी शिवसेनेचे राजू पेडणेकर यांनी केली आहे.

पावसाळ्याला काही दिवस उरलेले असल्याने या दिवसात नालेसफाई व रस्त्यांची कामे गतीने करुन घेतली जाऊ शकतात. पावसाळ्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी पुन्हा आचारसंहिता लागू होणार असल्याने, पुन्हा विकास कामे रखडतील असे पेडणेकर यांनी सांगितले.

दुष्काळाबाबत आचारसंहिता निवडणूक आयोगाने शिथिल केली आहे. इतर कामासाठी आचारसंहिता शिथिल केलेली नाही. तुमची भावना मी पालिका आयुक्तांना कळवतो, अशी भूमिका पालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र चोरे यांनी बैठकीत बोलून दाखवली. सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी नागरिकांच्या सोयी सुविधेची कामे लवकरात लवकर व्हावीत म्हणून आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Intro:मुंबई -
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २९ एप्रिलला मतदान झाले. त्यानंतर अद्याप आचारसंहिता शिथिल करण्यात आलेली नाही. आचारसंहिता लागू असल्याने मुंबईमधील नालेसफाई आणि विकासकामे रखडली आहेत. मुंबईकरांना सोयी सुविधा देण्याच्या कामातही आचारसंहिता लागू असल्याची कारणे प्रशासनांकडून दिली जात आहेत. यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात दिलासा देता यावा म्हणून आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी पालिकेच्या सुधार समितीत करण्यात आली.
Body:मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबते. पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. त्यामुळे पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे केली जातात. या कामांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक लक्ष ठेवून असतात. मात्र यावर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने ही कामे संथ गतीने सुरु आहेत. याचा परिणाम पावसाळयात होऊ शकतो अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल होऊ शकते. तर मुंबईकरांना सोयी सुविधा आणि सुरु असलेली कामी करायला आचारसंहिता कसली, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेचे राजू पेडणेकर यांनी २०१४ मध्ये निवडणूकिसाठी मतदान झाल्यावर आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती. यासंबंधीचे निर्णय बैठकीत सादर करवून पालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली. पावसाळ्याला काही दिवस उरलेले असल्याने या दिवसात नालेसफाई व रस्त्यांची कामे गतीने करून घेतली जाऊ शकतात. पावसाळ्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी पुन्हा आचारसंहिता लागू होणार असल्याने पुन्हा विकास कामे रखडतील असे पेडणेकर यांनी सांगितले.

दुष्काळाबाबत आचारसंहिता निवडणूक आयोगाने शिथिल केली आहे. इतर कामासाठी आचारसंहिता शिथिल केलेली नाही असे स्पस्ट करून तुमची भावना मी पालिका आयुक्तांना कळवतो असे पालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र चोरे यांनी बैठकीत सदस्यांना सांगितले. नागरिकांच्या समस्या आणि कामांची पाहणी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे करू शकतात. एकत्रित नाही असे चोरे म्हणाले. सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी नागरिकांच्या सोयी सुविधेची कामे लवकरात लवकर व्हावीत म्हणून आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा असे निर्देश प्रशासनाला दिले.

सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांचा बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.