ETV Bharat / state

Shital Mhatre Morph Viral Video : व्हायरल व्हिडिओवर शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, घाणेरड्या गाण्यांसह हा व्हिडिओ... - व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा

सध्या सोशल मीडियावर शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या विरोधात शीतल म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे. या व्हिडिओत शितल म्हात्रे यांच्यासोबत आमदार प्रकाश सुर्वे देखील दिसत आहेत. यावर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा शितल म्हात्रे यांनी केला आहे.

Shital Mhatre Reaction
शीतल म्हात्रे
author img

By

Published : Mar 12, 2023, 10:37 PM IST

मुंबई : मध्यरात्री फेसबुकवर एका पेजवरून शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका ओपन जीपमध्ये एका रॅलीच्या कार्यक्रमात दिसत आहेत. ही रॅली म्हणजे सध्या भाजप आणि शिवसेनेची सुरू असलेली आशीर्वाद यात्रा असल्याचा दावा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या फेसबुक हँडलवरून करण्यात आला होता. यावर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला लक्ष्य करणारा व्हिडीओ बनवण्यात आल्याचे सांगत तो व्हिडीओ मॉर्फ केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाल्या शीतल म्हात्रे ? : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की, स्थानिक आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेल्या रॅलीदरम्यान मला लक्ष्य करणारा व्हिडिओ बनवण्यात आला होता. मातोश्री नावाच्या एफबी पेजवर घाणेरड्या गाण्यांसह हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता, लोकांना तो व्हायरल करण्यासाठी प्रोत्साहित करत होता आणि हा व्हिडीओ मॉर्फ केला आहे, असेही त्या म्हणाल्या.

रूपाली ठोंबरे-पाटील यांची प्रतिक्रिया : व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ आहे किंवा नाही याचा तपास झाला पाहिजे. ज्याने व्हिडीओ व्हायरल केला असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. पण मला शीतल म्हात्रेंना सांगायचे आहे की, त्यांनी जे पेरले ते उगवताना दिसत आहे यामुळे त्याचाच त्यांना त्रास होत आहे. आम्ही जरी विरोधक असलो तरी अशा या गोष्टींना अजिबात थारा देणार नाही, असे त्या म्हणाल्या.

शिवसैनिकांची मागणी : हा व्हिडिओ मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वायरल होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस ठाणे गाठले होते. यावेळी हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी शिवसैनिकांनी पोलिसांकडे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दहिसर येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आलं होते. या रॅलीमधला हा व्हिडिओ असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Sheetal Mhatre News: पप्पी दे पप्पी दे पारूला, शिवसेनेच्या शितल म्हात्रे यांचा कथित व्हिडीओ व्हायरल; दोन जणांना घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.