मुंबई: महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदिया ते कोल्हापूर अशी धावते आणि ही पुण्यावरून जात असल्यामुळे लाखो लोक या गाडीने रोज प्रवास करतात मात्र कोपरगाव व कानेगाव या भागामध्ये अर्थात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी दोन दिवस रद्द करण्यात आलेली आहे तसेच अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदललेले आहेत. 13 आणि 20 जानेवारी रोजी दादरहून निघणारी दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.
14 आणि 21 जानेवारी रोजी साईनगर पासून शिर्डीला रवाना होणारी साईनगर शिर्डी ते दादर एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे. 23 जानेवारी रोजी दादर वरुन शिर्डी कडे रवाना होणारी दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही देखील रद्द करण्यात आली आहे . 24 जानेवारी रोजी देखील साईनगर शिर्डी पासून ते दादर येणारी शिर्डी एक्सप्रेस ही देखील रद्द केली आहे. गाडी क्रमांक 01135 भुसावळ दौंड मेमो 12 आणि 19 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे
गाडी क्रमांक 01336 दौंड पासून ते भुसावळ पर्यंत जाणारी मेमू एक्सप्रेस 12 आणि 19 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे तसेच गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर पासून ते गोंदियापर्यंत जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस 21 आणि 22 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे तसेच गाडी क्रमांक 01336 गोंदियाहून कोल्हापूरला जाणारी एक्सप्रेस 21,22 ,23 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
गाडी गाडी क्रमांक 1282 निजामुद्दीन मैसूर एक्सप्रेस 23 जानेवारी रोजी निघणारी ही गाडी संत हिरादम नगर नागदा रतलाम वडोदा वसई पनवेल कर्जत लोणावळा पुणे मार्गाने मैसूर जाणार आहे. तसेच गाडी क्रमांक 11130 हावडा पुणे 22 जानेवारी रोजी निघणरी ही गाडी मार्ग बदलून नागपूर बल्लारशा ताजीपेठ सिकंदराबाद वाडी दौंड या मार्गावरून पुण्याला जाईल .तसेच गाडी क्रमांक 17206 काकीनाडा साईनगर शिर्डी 23 जानेवारी रोजी निघणारी ही ट्रेन या मार्गाने जाईल. सिकंदराबाद, वाडी, दौंड पुणतांबे या मार्गाने साईनगर शिर्डी पर्यंत जाईल.
तर गाडी क्रमांक 22846 हटिया पुणे 22 जानेवारी रोजी निघणारी ही गाडी नागपूरहून बल्लारशा ,काझीपेठ ,सिकंदराबाद, वाडी दौंड मार्गावरून पुण्याला जाईल. तर गाडी क्रमांक 12103 पुणे ते लखनऊ 24 जानेवारी रोजी जाणारी ट्रेन लोणावळा कर्जत पनवेल वसई वडोदरा रतलाम, नागदा, संत हिरादम नगर मार्गाने लखनऊ पर्यंत जाईल .तर गाडी क्रमांक17205 ही साईनगर शिर्डी ते काकीनाडा एक्सप्रेस 24 जानेवारी रोजी जाणारी ट्रेन पुणतांबा दौंडवाडी सिकंदराबाद मार्गाने काकीनाडा पर्यंत जाईल.
गाडी क्रमांक 127 कोल्हापूर निजामुद्दीन एक्सप्रेस 24 जानेवारी रोजी पुणे लोणावळा कर्जत पनवेल वसई वडोदरा रतलाम नागदा संत इरादम नगर भोपाल मार्गाने निजामुद्दीन पर्यंत जाईल तर गाडी क्रमांक 22141 पुणे नागपूर 19 जानेवारी रोजी निघणारी गाडी लोणावळा होऊन पनवेल कल्याण इगतपुरी मनमाड या मार्गावरून लखनऊला जाईल. गाडी क्रमांक 22142 नागपूर ते पुणे जाणारी 20 जानेवारी रोजीची गाडी मनमाड इगतपुरी कल्याण पनवेल लोणावळा या मार्गाने पुण्यापर्यंत जाईल
गाडी क्रमांक 22139 पुणे ते अजनी एक्सप्रेस 21 जानेवारी रोजी लोणावळा पनवेल कल्याण इगतपुरी मनमाड मार्गाने अजनी ला जाईल तर गाडी क्रमांक 22140 अजनी ते पुणे एक्सप्रेस 22 जानेवारी रोजी मनमाड इगतपुरी कल्याण पनवेल लोणावळा मार्गाने पुण्याला जाईल. अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभाग भुसावळ विभाग या ठिकाणी सोलापूर विभागासाठी दूरध्वनी क्रमांक 02172312270 तर मध्य रेल्वेवरील भुसावळ विभाग येथे 02582222213 / 02582222585 / या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.