मुंबई : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे सेनेकडून सुरू झाला आहे. विधानसभेनंतर आता विधान परिषदेत शिंदे सेनेकडून विपल्व बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करावी, असे पत्र दिले. या पत्रावर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी खुलासा केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन नावे आधीच विधान परिषदेकडे पाठवली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचे आणि बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करावी, असे लेटर मिळाले आहे. या पत्रावर अभ्यास करून कोर्टातील प्रकरण समजून घेऊन योग्य निर्णय करू, असे गोऱ्हे म्हणाल्या. तसेच तातडीने कोणताही निर्णय केला नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणांचा विचार करून योग्य निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांची विधिमंडळात खलबत्त सुरू आहेत. शिंदे आणि भाजप सरकारची देखील सकाळी दहा वाजता बैठक सुरू झाली आहे. सर्व आमदारांना या बैठकीला बोलावण्यात आले. भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली आहे. हा महत्त्वाचा अर्थसंकल्प असून आमदारांचे प्रश्न आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री ही बैठक बोलावल्याचे गोगावले म्हणाले. तर यावर आता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्र प्राप्त झाली आहेत. काल एकनाथ शिंदे यांच्या सहीने पत्र आले आहे. या पत्रावर अभ्यास करून कोर्टातील कायदेशीर बाबी समजून घेऊन योग्य निर्णय करू. आता निर्णय केलेला नाही. चालू केलेल्या केसेसचा विचार करून निर्णय होईल, असे त्या म्हणाल्या.
निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही : सत्तांतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असताना शिंदे सेनेकडून शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्यात आले. गोगावले यांनी यावर भाष्य केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे निर्णय तो आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे असे गोगावले म्हणाले. आम्ही बजावलेले व्हीप केवळ कामकाजाला हजेरी लावणे आणि उपस्थिती दाखवणे यासाठी आहेत. दोन आठवडे कोणावर ही कारवाई केली जाणार नाही, असे गोगावले यांनी सांगितले.
भास्कर जाधव शिंदे गटासोबत येण्यास इच्छुक : भास्कर जाधव यांनी शिंदे गटात येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि भाजपचे नेते मनोज कंबोज यांनी केला. यात तथ्य असल्याचे गोगावले यांनी सांगितले. भास्कर जाधव शिंदे गटासोबत येण्यास इच्छुक होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना संपर्क साधला. दोघांमध्ये संभाषण चालू होते, परंतु पुढे काय झाले मला माहित नाही. मात्र म्हस्के आणि कंबोज यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे गोगावले यांनी म्हटले.
विधानसभेत शिंदे सेनेचे मोठे संख्याबळ : आता विधान परिषदेत ते वाढवण्याचा प्रयत्न आहे. विपल्व बजोरिया यांची विधान परिषदेत प्रतोद पदी निवड करावी, या मागणीसाठी सभापती नीलम गोरे यांना पत्र देण्यात आले आहे. ही सुरुवात आहे, लवकरच हळूहळू कळतील असे गोगावले यांनी सांगितले. तसेच सचिन अहिर आणि विलास पोतनीस यांना गटनेते करावे, असे पत्र दिले आहे. या पत्रासंदर्भात विचार केला जाईल. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाला आहे त्यामुळे आमचे नियम सर्वांना लागू असतील अशी गोगावले यांनी सांगितले.
नार्वेकरांना आमदार व्हायचे आहे : राज्यपाल अभिभाषणाच्या कार्यक्रमात मिलिंद नार्वेकर आमदारांच्या सभागृहात येऊन बसले. त्यांना आमदार होण्याची इच्छा आहे. मात्र उद्धव ठाकरे असेपर्यंत ते शक्य होणार नाही. आमच्या सोबत आल्यास विचार केला जाईल, असे गोगावले यांनी म्हटले. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर तोडगा : अंगणवाडी सेविका आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न संदर्भात राज्य सरकार विचाराधीन आहे त्यांचा अनुदान वाढवून मिळाला व यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यातून नक्की तोडगा काढतील असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.
बाळ संगोपन कक्ष : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोज अहिरे यांनी विधिमंडळातील बाळ संगोपन रक्षा बाबत आक्षेप नोंदवला होता. त्याची पाहणी करून योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे. महिनाभराच्या अधिवेशन असताना येथील सूर्य व्यवस्था राखण्याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, सोयी सुविधा पुरवण्यासाठी विधिमंडळ खर्चातून काम करण्यास अडथळा येत असेल तर तो माझ्या निधीतून करण्यास सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Maha Budget Session Live Updates: विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु