मुंबई- हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणांमध्ये ( Sheena Bora murder case ) प्रमुख साक्षीदार राहुल मुखर्जीची उलट तपासणी आज ( Cross-examination of Rahul Mukherjee in Sheena Bora murder case ) पार पडली. उलट तपासणीत पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा राहुल मुखर्जीने केला आहे. अमरसन्सजवळ इंद्राणी आणि ड्रायव्हर शाम यांना कारच्या बाहेर उभे असल्याचा जबाब मी सीबीआय तसेच खार पोलिसांना दिला नाही, असा धक्कादायक खुलासा आज विशेष सीबीआय कोर्टामध्ये राहुल मुखर्जी ने केला आहे.
उद्या पुन्हा उलट तपासणी - शीना बोराला गाडीमध्ये अमरसन्सजवळ बसून नेताना मी इंद्राणी तसेच ड्रायव्हर शाम यांना गाडी बाहेर उभे असताना मी पाहिले नाही. मात्र, सीबीआय, खार पोलिसांच्या जबाब मी पाहिले असल्याचा उल्लेख आहे. तो, चुकीचा असल्याचे राहुल मुखर्जीने आज कोर्टासमोर साक्ष देतांना सांगितले आहे. राहुल मुखर्जीच्या आजच्या उलटतपासणीत धक्कादायक पुरावे आजही इंद्राणीच्या वकिलांनी सादर केले आहे. उद्या 18 नोव्हेंबर रोजी पुन्हा उलट तपासणी होणार आहे.
राहुल मुखर्जी याने कोर्टासमोर सांगितले की, माझे वडील पीटर मुखर्जी निर्दोष ( Peter Mukherjee son told the court My father is innocent ) आहे. पीटर मुखर्जी यांच्या संदर्भात इंद्राणी मुखर्जी यांच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नावर राहुल मुखर्जी यांनी उत्तर दिले आहे. मी माझ्या वडिलांच्या निर्दोषच्या मुक्तीसाठी पंतप्रधान, राष्ट्रपतीना पत्र लिहिले आहे. ही बाब खरी असल्याचे देखील राहुल मुखर्जी याने आज जबाब नोंदविताना विशेष सीबीआय कोर्टामध्ये म्हटले आहे.
काय म्हणाला नेमका राहुल मुखर्जी ? मॅजिस्ट्रेटला दिलेल्या माझ्या 164 च्या निवेदनात मी सांगितले की, मी इंद्राणी तसेच शाम सारखे दिसणारे दोन व्यक्ती पाहिले. फक्त काही सेकंदात एक नजर टाकली. ती खरोखर इंद्राणी होती की शाम हे कळवले नाही. 3 आरोपींना अटक केल्यानंतर माझा जबाब नोंदवण्यात आला. मला सर्व 3 आरोपींची नावे माहीत आहेत. पण मी संजीव खन्ना यांचे नाव खार, सीबीआय किंवा मॅजिस्ट्रेट यांना जबाबात सांगितले नाही. वरळी सीफेसजवळ 2011 मध्ये माझे वडील, इंद्राणी दिसल्याचा मी गैरसमज करून घेतला असल्याचे त्याने कोर्टाला सांगितले.
जाणून घ्या कोण आहेत इंद्राणी, पीटर, राहुल मुखर्जी - इंद्राणी मुखर्जीवर 24 एप्रिल 2012 रोजी तिची मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे. इंद्राणी उर्फ परी बोरा ही मूळ आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहे. त्यांच्या वडिलांचे नाव उपेंद्र कुमार बोरा आणि आईचे नाव दुर्गा राणी बोरा आहे. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांचे शिक्षण गुवाहाटी येथील मिशनरी शाळेत झाले. त्यांनी पुढील शिक्षण शिलाँगमध्ये केले. इंद्राणीचे पहिले लग्न सिद्धार्थ दास नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. त्याला मिखाईल आणि शीना ही दोन मुले होती. या दोन मुलांच्या जन्मानंतर इंद्राणीने कोलकाता येथील हॉटेल व्यवसायाशी संबंधित संजीव खन्ना यांच्याशी लग्न केले. त्या लग्नापासून त्यांना विधी ही मुलगी झाली. इंद्राणीने 2002 मध्ये विधी सहा वर्षांची असताना स्टार इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केले. नंतर दोघांनी मिळून एका मीडिया संस्थेची पायाभरणी केली, ज्याची इंद्राणी सीईओ बनली.
पीटर मुखर्जी: स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांनी इंद्राणीशी लग्न केले आहे. पीटरला त्याची पहिली पत्नी शबनमपासून दोन मुले आहेत - राहुल आणि राजीव. शीनाच्या हत्येची माहिती पीटरला होती, असे पोलिसांचे मत आहे, तर पीटरचे म्हणणे आहे की, शीना अमेरिकेत राहत असल्याचे त्याला सांगण्यात आले होते.
राहुल मुखर्जी : हा पीटर मुखर्जीचा मुलगा आहे. त्याचे शीनावर प्रेम होते आणि दोघे जवळपास दीड वर्षे एकत्र राहत होते, पण इंद्राणीला दोघांमधील नाते पसंत नव्हते. चौकशीत राहुलने खुलासा केला की हत्येवेळी शीना गर्भवती होती.