ETV Bharat / state

भाजपला सोडचिठ्ठी देत शशिकांत चव्हाण पुन्हा शिवसेनेत; रामदास कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश - रामदास कदम न्यूज

शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. मात्र, काही कारणाने शिवसेनेपासून दूर जात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रविवारी ते पुन्हा स्वगृही परतले आहेत.

Shashikant Chavan join shivsena
शशिकांत चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Jul 27, 2020, 7:19 AM IST

मुंबई - एकेकाळी शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शशिकांत चव्हाण यांनी मध्यंतरी काही कारणामुळे शिवसेनेला सोडून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, रविवारी त्यांनी पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. मात्र, काही कारणाने शिवसेनेपासून दूर जात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रामदास कदम यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केला.

शिवसेनेत चव्हाण यांनी पुन्हा प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. लवकरच शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. चव्हाण परत आल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.