ETV Bharat / state

Sharmila Thackeray On Uorfi Javed : मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहीत नाही, शर्मिला ठाकरेंचा उर्फी जावेदला टोला - Thackeray Criticized Urfi Javed

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उर्फी जावेद प्रकणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहीत नाही, अशी टीका त्यांनी उर्फी जावेद यांच्यावर केली आहे (Sharmila Thackeray On Uorfi Javed). त्या कळंबोलीत मनसे 2023 मनसे चषक या स्पर्धेला हजेरी लावण्यासाठी आल्या होत्या.

Sharmila Thackeray criticized Urfi Javed
शर्मिला ठाकरे यांनी उर्फी जावेद यांच्यावर टीका
author img

By

Published : Jan 16, 2023, 4:02 PM IST

नवी मुंबई : सध्या अभिनेत्री उर्फी जावेद व चित्रा वाघ यांचा वाद सुरू आहे. उर्फी जावेदवर विचारलेल्या प्रश्नांवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहीत नाही असा मिश्किल टोला उर्फी जावेदला लगावला आहे.

नाव न घेता लगावला टोला - राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या कळंबोलीमध्ये मनसे शहराध्यक्ष राहुल चव्हाण आयोजित मनसे 2023 मनसे चषक या स्पर्धेला हजेरी लावण्यासाठी आल्या होत्या. यावेळी माध्यमांनी शर्मिला ठाकरे यांना उर्फी जावेद, चित्रा वाघ वाद विवाद प्रकरणी विचारले असता त्यांनी मिश्किल टोला लगावला. मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. शर्मिला ठाकरे यांनी उर्फीला मारलेल्या मार्मिक टोल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

काय आहे प्रकरण : सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद या अभिनेत्रीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी उर्फीची चौकशी देखील केली होती. उर्फी जावेदची चौकशी करावी म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानंतर उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ यांचे कार्यकर्ते आपल्यावर हल्ला करू शकतात असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली होती.

अधिक बोलणे टाळले : उर्फी जावेद, चित्रा वाघ यांच्यात झालेल्या वादानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना माध्यमांनी याप्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता शर्मिला ठाकरे यांनी त्यांची सावध प्रतिक्रिया दिली. याशिवाय मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला काही माहीत नाही असेही उर्फीचे नाव न घेता त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Urfi Javed Vs Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्याकडून माझ्या जीवाला धोका, अभिनेत्री उर्फी जावेद आयोगाच्या दारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.