ETV Bharat / state

कोरेगाव भिमा प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... - कोरेगाव भिमा प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. या दंगलप्रकरणातील मूळ सुत्रधार बाजूला ठेऊन बुद्धिजीवी लोकांना अटक केली होती. हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र असल्याचा आरोप पवारांनी केला आहे.

sharad pawar wrote letter to cm uddhav thackeray for koregaon bhima riot
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...
author img

By

Published : Jan 24, 2020, 11:35 AM IST

मुंबई - कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. या दंगलप्रकरणातील मूळ सुत्रधार बाजूला ठेऊन बुद्धिजीवी लोकांना अटक केली होती. हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची SIT कडून चौकशी करण्याची मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सुत्रधारांना पाठीशी घालून, मुख्य मुद्यांवरून लक्ष हटविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप पवारांनी केला. पोलीस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली होती. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.

'जब जुल्म हो तो बगावत होनी चाहीये, शहर मैं अगर बगावत ना हो तो बहेतर है की रात ढलने से पहले ये शहर जल कर राख हो जाये'. ही जर्मन कवीची अनुवादीत कविता सुधीर ढवळेंनी वाचल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. तर डॉ. आनंद तेलतुंबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातं जावई आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. गोलपीठामध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ती साहित्यिक अर्थाने बोध घ्यावा. त्या कवितेकडे देशद्रोह आणि समाज विघातक म्हणून बघू नये असेही पवार म्हणाले.

भीमा कोरेगाव दंगलीस एल्गार परिषदेतील चिथावणीखोर जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. यातील काही जणांचा माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली. यामध्ये काही बुद्धिजिवी आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीकडून (SIT) चौकशी करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

Intro:Body:

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील मुद्दे....

*कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीविना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे*

कोरेगाव भीमा बाबत शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सुत्रधारणा पाठीशी घालून मुख्य मुद्यांवरून लक्ष हटविण्याचे षडयंत्र असा गंभीर आरोप शरद पवार यांचा

अटक झालेल्या सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची अनुवादित कविता वाचली 

जब जुल्म हो तो बगावत होनी चाहीये शहर मैं

अगर बगावत ना हो तो बहेतर है की रात ढलने से पहले ये शहर जल कर राख हो जाये...यासाठी त्यांना अटक केले,

*डॉ.आनंद तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते जावई आहे,त्यांच्यावर कारवाई करण्यात आली*

गोलपीठा मध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे,ती साहित्यिक अर्थाने बोध घेण्याऐवजी ते देशद्रोह आणि समाज विघातक म्हणून निष्कर्ष काढू नये

पोलीस तपस यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली, पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या याची खोलात जाऊन चौकशी आवश्यकता आहे

कोरेगाव भीमा दंगलीस एल्गार परिषदेतील चिथावणीखोर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला

ह्यातील काही जणांच्या माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली

ह्यात काही बुद्धिजिवी आणि प्रतिष्ठित लोकांचं समावेश आहे

म्हणून याप्रकरणी SIT नेमावी अशी मागणी शरद पवार यांनी केली

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.