मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या स्वतःहून ईडी कार्यालयात जाणार आहेत. पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांनी कार्यकर्त्यांना उद्या ईडी कार्यालयासमोर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - पवारांवरील कारवाईबाबत काँग्रेस नेते गप्प का? इतिहासात दडलीत कारणे!
शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन, ईडीने आपल्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्याकडून विचारणा होण्यापूर्वीच आपणच त्यांच्याकडे जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ते उद्या दोन वाजता बेलोर्ड पीयर येथील ईडी कार्यालयात जाणार आहेत. सोशल मीडियावर अनेक तरुणांनी पवार यांच्या पाठिशी उभे असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे