ETV Bharat / state

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी शरद पवार राहणार उपस्थित - शरद पवार बाळासाहेब ठाकरेंची मैत्री

यांची आज 95 वी जयंती निम्मित शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले अभिवादन

मुंबई बाळासाहेब ठाकरे पुतळा अनावरण न्यूज

author img

By

Published : Jan 23, 2021, 1:05 PM IST

मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटरच्या अभिवादन केले. ट्विटसोबतच शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे सोबत असलेले आपले फोटोही शेयर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुंबई बाळासाहेब ठाकरे पुतळा अनावरण न्यूज
शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना केले अभिवादन

राजकीय विचार भिन्न असूनही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री

व्यंगचित्रकार, स्पष्ट वक्ते, दिलदारपणा आणि रोखठोक स्वभाव यामुळे महाराष्ट्रच नाही तर, देशभर बाळासाहेब ठाकरेंचे चाहते आहेत. राजकीय विरोधक असणाऱ्या अनेक नेतेमंडळीही बाळासाहेब ठाकरेंचे मित्र होते. त्यात सर्वात आधी शरद पवार यांचे नाव आहे. राजकीय विचार भिन्न असूनही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर होती. अनेक वेळा या दिग्गज नेत्यांनी मंचावर एकत्र येऊन आपल्या मैत्रीची किस्से सांगितलेले सर्व देशाने पाहिले आहेत. आजही अनेक वेळा शरद पवार आपल्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढताना दिसतात.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली

मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या आनावरणावेळी शरद पवार राहणार उपस्थित

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधत दक्षिण मुंबईत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

हेही वाचा - फडणवीसांचे एकीकडे बाळासाहेबांना अभिवादन; तर दुसरीकडे शिवसेनेला फटकारे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.