मुंबई - लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 तारखेला संपणार आहे. त्यामुळे जर लॉकडाऊन उठवल्यास कोणाही एकत्र येऊन गर्दी करण्याची गरज नाही. परिस्थिती गंभीर आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन वागावे लागेल. 3 तारखेनंतर शासनाची काय भूमिका असेल हे लवकरच स्पष्ट होईल. कोरोना हे संकट गंभीर आहे पण याआधीही अनेक संकटांना आपण सामोरे गेले आहोत, असे खासदार शरद पवार म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मे महिन्यात बँकांना नऊ दिवस सुटी असल्याने बँका बंद असतील. त्यामुळे घाईने तेथे गर्दी करण्याची गरज नाही. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशास व यंत्रणेवर हल्ले केल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यातून वेदना होतात. या यंत्रणांना आपण सहकार्य केलेच पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
बाहेरगावी अडकलेल्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था
सरकारने विद्यार्थी, प्रवासी व बाहेरगावी अडकलेल्या कामगारांना परत आणण्यासाठी व्यवस्था केली आहे. सरकारने मुंबई येथे संचालक अभय यावलकर यांच्या देखरेखीखाली कार्यालय उभारले आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी 022-22027990 व 22023039 किंवा 9821107565, 8007902145 यावर संपर्क साधल्यास आपल्याला सहकार्य मिळेल, असेही सांगितले.
हेही वाचा - एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये : मुख्यमंत्री