मुंबई - 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या बाबत भारतीय जनता पक्षाच्या मनात भीती आहे. त्यामुळेच देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांच्यावर कारवाई केली जात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खटले भरले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मात्र या सर्व प्रकाराला आम्ही राजकीय दृष्ट्या तोंड ( will face the political actions ) देऊ. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला दिला ( Sharad Pawar criticize BJP ) आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकारांची संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला.
राहुल गांधी यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रा करत ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) आहेत. यात्रा करणे हे चांगले असून खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेची सहानुभूती राहुल गांधी यांना या यात्रेच्या माध्यमातून मिळताना दिसतेय. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुल गांधी यांना या यात्रेचा फायदा झाला तर त्यात काहीही चुकीचे नाही असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं.
विरोधकांना एकत्र आणणे काळाची गरज - 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता सर्व विरोधकांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत नितीश कुमार यांच्या सोबत आपली या मुद्द्यावर एक बैठकही पार पडली. काँग्रेस सहित सर्व विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे असं मत सर्वांचा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राज्यात काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली होती त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या मनात काँग्रेस बाबत राग आहे मात्र देशाचं हित पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सहित सर्वच विरोधक एकत्र यावेत असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचही मत असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितले.