ETV Bharat / state

Sharad Pawar On Police Bharti : कंत्राटी पोलीस भरतीला शरद पवारांचा विरोध; म्हणाले, महिलांना... - कंत्राटी पोलिसांची भरती

Sharad Pawar On Police Bharti : मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याच्या वतीनं घेण्यात आलाय. तर सरकारच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोध केलाय.

Sharad Pawar On Police Bharti
मुंबई कंत्राटी पोलीस भरती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 10:32 PM IST

मुंबई : Sharad Pawar On Police Bharti : मुंबईत मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याच्या वतीनं घेण्यात आलाय. त्यासाठी गृह खात्याकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करत, अशा 'कंत्राटी' भरतीत आरक्षणाची तरतूद नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.

यामुळं मागासवर्गीयांना आरक्षण मिळू शकणार नाही : कंत्राटी नियुक्तीमुळं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळू शकणार नाही. तसेच महिला इच्छुकांनाही डावलले जाऊ शकतं. एकदा का कोणालाही करारावर नियुक्त केलं की, त्याची नोकरी विशिष्ट कालावधीसाठी असते, मग ती एक वर्ष, दीड वर्ष, किंवा दोन वर्षांसाठी असते. तो कालावधी संपल्यानंतर त्या व्यक्तीला नोकरी सोडावी लागते. तसेच पोलीस खात्यात कंत्राटी पद्धतीने नेमलेली व्यक्ती तत्परतेनं काम करेल, असे मानणे मूर्खपणाचे ठरेल, असं शरद पवार म्हणाले.

पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद : नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची (Mumbai Police) गरज भासते. याच पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळांच्या वतीनं मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारसुद्धा कंत्राटी? : महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू असून, त्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अजून सर्व्हे सुरू झाला नाही. ED सरकार आल्यापासून फक्त घोषणांचा पाऊस पडत आहे. जनतेचा आता सरकारवर भरोसा राहिला नसल्याची प्रतिक्रिया, नाना पटोले यांनी दिली होती. मुंबई कंत्राटी पोलीस भरतीवरून त्यांनी सरकारचा समाचार घेतला होता. पोलीस भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने असेल तर आता हे सरकारसुद्धा कंत्राटी आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता.

हेही वाचा -

  1. Contract Police Bharti : मुंबई कंत्राटी पोलीस भरती प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक
  2. IPS Deven Bharti: देवेन भारती यांच्याकडे मोठी जबाबदारी, मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
  3. एसईबीसी अंतर्गत राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया- गृहमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.