ETV Bharat / state

Sharad Pawar : 'मला कितीही लोक येऊन भेटले तरीही माझ्या भूमिकेत बदल होणार नाही' - ncp political crisis

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बंडखोर नेते व आमदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वारंवार भेट घेत आहेत. रविवारी आणि सोमवारी अशा दोन्ही दिवशी बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांची वायबी सेंटर येथे भेट घेतली. भूमिकेत बदल करण्यासाठी हे सर्व नेते पवारांना भेटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, कोणी कितीही भेटूद्या मी माझ्या भूमिकेत बदल करणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत शरद पवार यांनी अधिकृत प्रतिक्रिया अजून दिलेली नाही.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 17, 2023, 6:16 PM IST

Updated : Jul 17, 2023, 6:29 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षातील काही सहकाऱ्यांना घेऊन अजित पवार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत अजित पवार यांच्यासह आठ सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि 8 मंत्र्यांनी वाय बी सेंटर येथे भेट घेतली होती. सोमवारी दुसऱ्यांदा अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली.

भूमिकेत बदल होणार नाही - मला कितीही लोकं येऊन भेटले तरीही माझ्या भूमिकेत बदल होणार नाही. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा प्रकारची भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, याबाबत शरद पवार यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होते. पक्ष एकसंघ राण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली आहे. आमची बाजू त्यांनी ऐकून घेतली असून यावर त्यांनी अजून प्रतिक्रिया दिली नाही - प्रफुल्ल पटेल, नेते, अजित पवार गट

छोट्या पवारांकडून मोठ्या पवारांना साकडे - राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा याअनुषंगाने शरद पवार यांनी विचार करावा, अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज आम्ही पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. रविवारी देखील हीच विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

आजही केली विनंती - शरद पवार आज वायबी सेंटरला असल्याचे आम्हाला कळले होते. तसेच काही आमदारांना शरद पवार यांना भेटण्याची इच्छा होती. तसेच शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला आलो होतो. पक्ष एकसंघ राहण्याच्या दिशेने आपण विचार करावा अशी विनंती आम्ही त्यांना आजही केली. शरद पवार यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. त्यांनी हे सर्व ऐकून घेतले. त्यांच्या भूमिकेविषयी आम्ही सांगू शकत नाही, त्यांच्या मनामधले आम्ही सांगू शकत नाही, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

मनधरणीसाठी प्रयत्न - अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. मागील तीन ते चार दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांना तिसऱ्यांदा भेटले आहेत. शरद पवार यांनी भाजपासोबत येण्यासंदर्भात शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार हे वारंवार साकडे घालत असल्याचे बोलले जातं आहे.

काँग्रेसकडून आक्षेप - अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेस पक्षाने मात्र आक्षेप घेतला आहे. बंद खोलीमध्ये होणाऱ्या चर्चा येत्या काही दिवसात स्पष्ट होतीलच, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी दिली. तर आजची भेट कोणालाही आवडलेली नसल्याचे मत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मांडले आहे. शरद पवारांकडून हा महाराष्ट्र अपेक्षा ठेवतो. ते लोकशाहीच्या बाजूने उभे राहतील असा समज असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. NCP MLAs Meet Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट; 'हे' आहे भेटीमागचे कारण
  2. Bhaskar Jadhav : 'मी पुन्हा येणार नाही व पुन्हा येईन... पुन्हा येईन... असे म्हटलेसुद्धा नाही'
  3. NCP Political Crisis: राष्ट्रवादीत हाय होल्टेज ड्रामा; अजित पवारांसह बंडखोर आमदारांची शरद पवारांसोबत चर्चा

Last Updated : Jul 17, 2023, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.