ETV Bharat / state

Sharad Pawar Profile - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची झंझावाती राजकीय कारकीर्द - undefined

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केली. पवार यांच्या गेल्या 54 वर्षातील राजकीय कारकीर्दीचा आढावा घेऊया.

Sharad Pawar Profile
Sharad Pawar Profile
author img

By

Published : May 2, 2023, 2:24 PM IST

Updated : May 2, 2023, 2:31 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वेसर्वा आणि राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेले शरद पवार यांनी आज आपली अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. मात्र पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र सध्यातरी शरद पवार यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास काय आहे हे जाणून घेऊया..

शरद पवारांची राजकारणात एंट्री - शरद पवार यांनी 22 फेब्रुवारी 1967 मध्ये पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेऊन संसदीय राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यानंतर गेली 54 वर्ष ते राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असून राज्यातील राजकारणच गेल्या अनेक वर्षांपूर्वी पासून त्यांच्या भोवती फिरताना आपण पाहत आहोत. शरद पवारांनी आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्यांचे वय 27 वर्ष इतके होते. बारामतीसारख्या अवर्षणग्रस्त भागातील आमदार म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे त्यांचे राजकीय गुरू मानले जातात यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना संधी दिली.

आणीबाणी नंतर पवार चर्चेत - 1977 मध्ये देशात आणीबाणी लावण्यात आली आणीबाणी नंतर काँग्रेसमध्ये फूट पडली इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन भाग काँग्रेसचे झाले यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यासह शरद पवार आणि महाराष्ट्रातील अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले 1978 मध्ये शरद पवारांनी आपले राजकीय डावपेच वापरायला सुरुवात केली तेव्हा ते पहिल्यांदा उजेडात आले आणि मंत्रीही झाले. 1978 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेस वेगळ्या लढल्या आणि जनता पक्ष मोठा पक्ष म्हणून समोर आला. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले मात्र या सरकारमध्ये अस्वस्थता होती म्हणून शरद पवार 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले.

1978 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री - 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करून शरद पवार यांनी सरकार स्थापन केले आणि अडविसाव्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री बनले. दीड वर्षाहून अधिक काळ त्यांचं हे सरकार टिकले. मात्र त्यानंतर जनता पक्षात फूट पडली आणि शेवटी इंदिरा गांधींच्या शिफारसीवरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

1980 मध्ये पवार पुन्हा काँग्रेसमध्ये - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत राजीव गांधी यांच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घर वापसी केली. शरद पवार यांनी खासदार म्हणून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली होती. महाराष्ट्रात शरद पवार यांचे नेतृत्व या निमित्ताने उभ राहिले होते. शंकरराव चव्हाण यांना केंद्राच्या राजकारणात स्थान देऊन शरद पवार यांना राजीव गांधी यांनी 1988 मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री केले.

केंद्रात संरक्षण मंत्री - शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना कधीही पंतप्रधान पदाची खुर्ची मिळाली नाही. त्यासाठी त्यांनी आटोकार प्रयत्न केला. मात्र त्याऐवजी त्यांना 90 च्या दशकात संरक्षण मंत्री पदावर समाधान मानावे लागले आणि पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान झाले. 1993 ला मुंबईत झालेल्या दंगली नंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परतावे लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना - राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेली मात्र सोनिया गांधींच आणि शरद पवारांची जमले नाही.. त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. 1999 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात चांगलंच यश मिळालं. त्यानंतर 2004 मध्ये यूपीएच सरकार राज्यात आलं यावेळीसुद्धा शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी होती मात्र ते पक्षात नसल्याने त्यांना ती मिळाली नाही मात्र त्यांनी दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री पद सांभाळले.

महाविकास आघाडीची स्थापना - 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय सत्ता स्थापनेच्या पेज प्रसंग मध्ये शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावत महाविकास आघाडीची स्थापना केली. यामध्ये किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. शरद पवार यांचे वय आता 82 वर्ष इतके झाले असले तरी गेल्या 54 वर्षात ते राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत इतके निश्चित म्हणूनच त्यांच्या पदाच्या निवृत्तीला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा - Sharad Pawar News : तुम्हीच आमची कमिटी... छगन भुजबळांसह सर्व नेते व कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या निवृत्तीला विरोध

Last Updated : May 2, 2023, 2:31 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.