मुंबई - भाजप नेता जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तकावरून राजकीय वातावरण तापले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने राज्यात भाजपला टीकेला सामोरे जावे लागत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवारंना चालते का ? असा प्रश्न भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पवार यांच्या समर्थनाथ फ्लेक्स लावले आहेत.
हेही वाचा... उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक
काल पुण्यातील पत्रकार परिषदेत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही जाणता राजा, या शरद पवार यांच्या उपाधीला आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबईचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी शरद पवार यांच्या समर्थन फ्लेक्स लावले आहेत. यात या फ्लेक्सवर 'आपली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा पण ज्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो, त्या नेतृत्वाच्या अल्प माहितीवर व अल्प अज्ञानातुन शिंतोडे उडवू नका. शरद पवार कालही, आजही व भविष्यातही आम्हा तरूणांचे जाणता राजा राहतील' असा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा... 'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून...