मुंबई - शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका ( Sharad Pawar criticizes Narendra Modi ) केली आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. कोणत्याही एका प्रांताचं हित लक्षात घेणे योग्य नाही असे पवार ( Sharad Pawar ) म्हणाले. तसेच कालच्या कार्यक्रमात मोदींनी विरोधकांच्यावर टीका केली, यावरही पवारांनी आक्षेप घेतला. पवार म्हणाले की, शासकीय कार्यक्रमात बोलताना भान ठेवले पाहिजे. प्रचार दौऱ्यात विरोधकांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र शासकीय कार्यक्रमात बोलताना काही संकेत पाळले पाहिजेत असेही पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले.
शासकीय कार्यक्रमांत विरोधकांवर टीका करणे चुकीचे - पक्षाच्या कार्यक्रमात विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे. मात्र नागपुरात शासकीय कार्यक्रम असताना विरोधकांवर टीकाटिपणी करणे हे योग्य नव्हते. पवार म्हणाले की, मी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक पंतप्रधानांचे भाषण ऐकली आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमातही जवाहरलाल नेहरूंनी कधी विरोधकांवर टीका केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली असे पवार यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेता हे लोकशाहीच्या संस्था आहेत. आतापर्यंत सर्व पंतप्रधानांनी ती सूत्रे पाळली, मात्र आता ती पाळली जात नाही याबाबत पवारांनी चिंता व्यक्त केली.
कोणी विरोध केला पवारांचा प्रश्न - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भूमिका मांडली समृध्दी महामार्गाला विरोधकांनी विरोध केला. कोणी विरोध केला, मला माहित नाही. मी औरंगाबादला असताना शेतकऱ्याचे एक शिष्टमंडळ भेटले. त्यांनी आपल्या जमिनी घेतल्या जात आहेत, पण रास्त किंमत मिळत नाही असे आपल्याला सांगितले. त्या नंतर आपण तात्कालीन मुख्यमंत्र्यांना फोन करून प्रकल्पाला विरोध नाही पण ज्यांची जामीन घेतो त्यांना योग्य मोबदला द्या असे सांगितले. शेतकऱ्यांना सन्मानाने जगता येईल हे करण्याचा प्रयत्न केला. पण लगेच सांगून टाकायचं आम्ही चांगल काम करतोय, विरोधक विरोध करत आहेत हे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.
महापूर्षांवर बोलताना भीक शब्द वापरणे चुकीचे - शिक्षण मंत्र्यांवर शाई टाकली याचे समर्थन मी करणार नाही. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण याचा अर्थ आंगावर शाई टाकणे योग्य नाही. मंत्र्यांनी महापूर्षांवर बोलताना भीक हा शब्द वापरला. हा शब्द कोणाला आवडणार नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वेळेला पत्नीचे मंगळसूत्र विकून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. महापूर्षांबद्दल बोलताना भीक हा शब्द वापरला नसता, तर चागल झालं असतं. आपण गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून आपल्यावर हल्ला झाला असे मंत्री म्हणतात. पण सामान्य कुटुंबातील व्यक्ती यशस्वी झाली हे उदाहरण केवळ तुमचं नाही. या आधीही तुम्ही मंत्री मंडळात होता. पक्षाचे प्रदेशध्यक्ष होता, अनेक जण सामान्य कुटुंबात जन्माला आले, यशस्वी झाले. त्यांच्यावर टीका टिप्पणी देखील झाली, मात्र त्यांनी कधी कांगावा केला नाही अशी टीका पावारांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.