मुंबई - मध्य प्रदेशमध्ये जी स्थिती उद्भवली तसे महाराष्ट्रात काहीही होणार नाही. मला महाराष्ट्राची माहिती आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे ५ वर्षे टिकणार याबाबत मला शंका नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्यात सरकार पाडण्याचा प्रयत्न होतो आहे, असे ऐकले. पण शिमगा नुकताच संपला आहे. त्यामुळे अजुन कुठला मुहूर्त विरोधकांना शिल्लक राहिलेला नसल्याचेही पवार म्हणाले.
हेही वाचा - संकटमोचक डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
हेही वाचा - उदयनराजे पुन्हा होणार खासदार.. आजच भाजप प्रवेश केलेल्या सिंधियांनाही राज्यसभेची उमेदवारी जाहीर
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार गेलं की नाही हे अजून बघायचं आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे, ते चमत्कार करू शकतात असे लोकांना वाटतय. त्यामुळे येत्या दोन दिवसात काय होईल, हे बघणे योग्य ठरेल, असेही पवार म्हणाले.