मुंबई Shahnawaz Hussain Heart Attack : भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी साडेचारच्या सुमारास हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
BJP leader Shahnawaz Hussain suffered cardiac arrest and was admitted to Lilavati Hospital in Mumbai, earlier this evening.
— ANI (@ANI) September 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(file picture) pic.twitter.com/ZoJGezSIDw
">BJP leader Shahnawaz Hussain suffered cardiac arrest and was admitted to Lilavati Hospital in Mumbai, earlier this evening.
— ANI (@ANI) September 26, 2023
(file picture) pic.twitter.com/ZoJGezSIDwBJP leader Shahnawaz Hussain suffered cardiac arrest and was admitted to Lilavati Hospital in Mumbai, earlier this evening.
— ANI (@ANI) September 26, 2023
(file picture) pic.twitter.com/ZoJGezSIDw
हुसेन यांची प्रकृती ठीक : मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या शाहनवाज हुसेन यांची प्रकृती ठीक असून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. डॉक्टरांचं पथक शाहनवाज हुसेन यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
2014 झाला पराभव : शाहनवाज हुसेन यांची गणना भाजपाच्या दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील सर्वात तरुण केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. शाहनवाज हुसेन यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा होता. यापूर्वी 2006 मध्ये भाजपानं त्यांना पोटनिवडणुकीच्या माध्यमातून संसदेत आणलं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षानं त्यांना 2019 च्या निवडणुकीत तिकीटही दिलं नव्हतं. शाहनवाज हुसेन यांनी ज्या जागेवरून निवडणूक लढवली, ती जागा भाजपानं जेडीयूला सोडली होती.
बिहारमध्ये विरोधकांच्या भूमिकेत : बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं शाहनवाज हुसेन यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उभं केलं होतं. यावेळी शाहनवाज हुसेन यांचा विजय झाला होता. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम केलंय. बिहारमधील जेडीयू, एनडीएची युती संपुष्टात आल्यानंतर शाहनवाज हुसेन यांचं उद्योग मंत्री पदही गेलं होतं. शाहनवाज हुसेन सध्या बिहारमध्ये विरोधकांच्या भूमिकेत आहेत. शाहनवाज हुसेन मुळचे बिहारचे असून ते सुपौल जिल्ह्यातील आहे.
हेही वाचा -
- Rohit Pawar News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अंदाज आहे, पण न्यायालयावर विश्वास - रोहित पवार
- JP Nadda Mumbai visit : जेपी नड्डा यांनी लालबागच्या राजाला ११ नारळाचे तोरण केले अर्पण, 'असा' राहिला मुंबईचा दौरा
- Sharad Pawar Criticized PM : पंतप्रधानांच 'ते' विधान क्लेशदायक..शरद पवारांनी महिला आरक्षणाबाबत मांडली भूमिका