ETV Bharat / state

Pathan Movie : 'पठाण' साठी शाहरुख खान करतोय अंगतोड मेहनत! - Pathan Movie

शाहरुख खान (Shah Rukh Khan) अभिनित पठाण चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित (The film is slated to release on January 25) होणार आहे. यासाठी प्रमुख भूमिकेत असलेला शाहरुख प्रचंड मेहनत घेतोय. त्याने आपल्या शरीरावर देखील अंगतोड मेहनत (Shah Rukh Khan is working hard for Pathan) घेतली आहे. त्यासाठी त्याने अगदी पराकोटीची जिम बॉडी बनविली आहे.

Pathan Movie
शाहरुख खान करतोय अंगतोड मेहनत
author img

By

Published : Nov 5, 2022, 3:29 PM IST

प्रत्येक चित्रपटागणीक अनेक अभिनेते शरीरावर मेहनत घेताना दिसतात. शाहरुख खान (Shah Rukh Khan) ने सिक्स पॅकस अँबस् फॅशन मध्ये आणले. गेल्या तीन वर्षात शाहरुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. गेल्या वर्षी तो रॉकेट्री, लाल सिंह चढ्ढा आणि ब्रह्मास्त्र मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून दिसला. त्याची प्रमुख भूमिका असलेला पठाण आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून; त्यासाठी शाहरुख प्रचंड मेहनत घेतोय. त्याने आपल्या शरीरावर देखील अंगतोड मेहनत (Shah Rukh Khan is working hard for Pathan) घेतली आहे. त्यासाठी त्याने अगदी पराकोटीची जिम बॉडी बनविली आहे. The film is slated to release on January 25 . Pathan Movie

शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेल्या ‘पठाण’च्या टीझरने इंटरनेटवर धुमाकूळ घातलेला आहे आणि चार वर्षानंतर बॉलीवूडचा बादशाह एसआरकेच्या मोठ्या पडद्यावरील पुनरागमन चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी जल्लोष करून स्वागत केले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या ॲक्शन दृश्यातील शाहरुख खानच्या पूर्णतः नवीन ॲक्शन अवतारामुळे लोक भारावून गेले आहेत.

‘पठाण’च्या दिग्दर्शकाने खुलासा केला आहे की, मेगास्टारने चित्रपटासाठी डिझाइन केलेल्या शारीरिकदृष्ट्या कठीण ॲक्शन सीक्वेन्ससाठी आपले शरीर तयार करताना आश्चर्यकारक निष्ठा दर्शविलेली आहे.

सिद्धार्थ म्हणतात की, 'शाहरुख खानने पठाणसाठी आपल्या शरीरावर ब्रेकींग पॉइंटपर्यंत मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे पठाणच्या टीझरकरिता त्याला भरभरून मिळणाऱ्या प्रेमासाठी आणि इतर गोष्टींसाठी तो पात्र आहे. मला आठवते की, जेव्हा मी त्याला पठाणसाठी पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा आम्ही चर्चा केली होती की हे त्याच्यासाठी शारीरिकदृष्ट्या किती कठीण असू शकेल आणि तो ताबडतोब यासाठी तयार झाला आणि ते पडद्यावर पहायला मिळते आहे.'

ते पुढे म्हणतात की, 'त्याला ॲड्रेनलीन रश हवी होती आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा त्याच्या मार्फत पडद्यावरची हीच भावना जाणवावी अशी त्याची इच्छा होती. ज्याप्रकारे त्याने आपले शरीर तयार केले आहे, अत्यंत धोकादायक स्टंट्स करण्यासाठी वेडेवाकडे प्रशिक्षण घेतले आहे, धोकादायक भूप्रदेशात आणि हवामानात स्वतःला झोकून दिले आहे आणि ॲक्शन दृश्य देण्यासाठी त्याने दाखविलेली समर्पित वृत्ती या सर्व गोष्टी आश्चर्यकारकपणे कौतुकास्पद आहेत.'

दिग्दर्शक पुढे म्हणतात की, 'आम्ही डिझाइन केलेली कृती करण्यासाठी त्याने ज्या प्रकारे सर्व वेदना सहन केल्या आहेत, ते अविश्वसनीय आहे. शाहरुख खानसारखा कोणीही नाही आणि त्याने या चित्रपटासाठी ठेवलेला उत्कट दृष्टिकोन पाहण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहण्याची वाट पहावी लागणार आहे.'

शाहरुख खान अभिनित पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. Pathan Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.