मुंबई : अभिनेता शाहरुख खानने त्याच्या 'पठाण' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशादरम्यान त्याच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केले. शाहरुख खानचा पठाण या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. शाहरुखच्या 'पठाण'ने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
मन्नतमधून चाहत्यांना अभिवादन : पठाणच्या यशाच्या आनंदात शाहरुख खानने रविवारी त्याच्या घरच्या मन्नतमधून चाहत्यांना अभिवादन केले. त्यांने चित्रपटाच्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खानने प्रथमच सर्वासमोर आला आहे. शाहरुख खान ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत असून चाहत्यांचे आभार मानत असल्याचे दिसत आहे.
भारतात १६१कोटींची कमाई : सुपरस्टार शाहरुख खानचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाचा डंका वाजत आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. शाहरुख खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे. ट्रेड अनालिस्ट तरण आदर्शच्या म्हणण्यानुसार, 'पठाण'ने शुक्रवारी ३८कोटी रुपयांची कमाई केली आहे. याआधी या चित्रपटाने बुधवारी ५५ कोटी, गुरुवारी ६८ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १६१कोटींची कमाई केली आहे.
शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात शाहरुख खानने पठाण नावाच्या रॉ एजंटची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर जॉन अब्राहम खलनायक बनला आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या पठाणमध्ये सलमान खानने कॅमिओ केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोल आहे.
हेही वाचा - Alia - Katrina Spotted : आलियासोबत कतरिनाही दिसली झोयाच्या घरी, आगामी चित्रपटसाठी भेटी-गाठी