मुंबई - पोलिसांच्या समाजसेवा शाखेने कांदिवली पश्चिम येथील स्टार बक्स कॅफेमध्ये चालत असलेल्या वेशा व्यवसायावर छापा टाकला. यामधून ४ तरुणींची सुटका करण्यात आली. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. एक तरुणी ही हिंदी वेब सिरीजमध्ये अभिनेत्री म्हणून काम करीत असून इतर दोन तरुणी या मॉडेल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथील इंडिगो एअरलाईन्सला लॉजीस्टिक सपोर्ट देणाऱ्या वायूदूत या कंपनीत काम करणारा आदित्य अरविंद चावडा (20) हा आरोपी मुंबईतील कांदिवली परिसरातील एका महिला वेश्यादलालाच्या संपर्कात आहे. तसेच तो वेश्यागमनासाठी मॉडेल मुली पुरवीत असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. या दरम्यान समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी आदित्य चावडा या आरोपीला बनावट ग्राहक बनून संपर्क साधला असता 3 मॉडेल मुलींचा सौदा 3 लाख 50 हजारांना करण्यात आला होता. यामध्ये आदित्य चावडा हा त्याचे कमिशन घेण्यासाठी अहमदाबाद येथून कांदिवली येथे 23 जानेवारीला आला होता.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये कांदिवली पश्चिम येथील स्टार बक्स कॅफे येथे 4 मॉडेल मुली यांच्यासह 2 वेश्या दलाल महिला व आरोपी आदित्य चावडा हा स्वतः पोलिसांना सापडला. पोलिसांनी या छाप्यामध्ये चार मॉडेलची सुटका केली असून यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. तसेच एक तरुणी ही हिंदी वेब सिरीजमध्ये अभिनेत्री म्हणून काम करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. इतर दोन तरुणी या मॉडेल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आदित्य चावडा याच्यासह 2 वेश्या दलाल महिलांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाई -
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टरला अटक
मुंबई पोलिसांकडून हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्रीची सुटका
मुंबईत बॉलिवूड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ विदेशी तरुणींची सुटका, दोघांना अटक