ETV Bharat / state

Sex racket busted मुंबईत 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश, भोजपुरी अभिनेत्रीला अटक - Bhojpuri actor arrested

गोरेगावमध्ये आणखी एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा शोध लागला आहे. पोलिसांनी कारवाई करत एका भोजपुरी अभिनेत्रीलाही अटक केली आहे. काल रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 22, 2023, 9:53 AM IST

मुंबई - मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एका आघाडीच्या भोजपुरी अभिनेत्रिला अटक करून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला. पोलिसांनी गोरेगावमधील एका आलिशान हॉटेलमधून तीन मॉडेल्सची सुटकाही केली असल्याचे सांगण्यात आले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसानी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या अंमलबजावणी कक्षाच्या पथकाने हॉटेलच्या खोलीवर संध्याकाळी छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांच्या हाती हे घबाड लागले आहे. 24 वर्षीय भोजपुरी अभिनेत्री ही या प्रसंगातून वाचवण्यात आलेल्या तीन मॉडेल्ससाठी एजंट म्हणून काम करत होती, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच ही अभिनेत्री हिंदी, पंजाबी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील ओटीटी शो आणि गाण्याच्या अल्बममध्ये दिसली होती, अशी माहितीही पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईनंतर एफआयआर नोंदवण्यात आली. रात्री उशिरा ही कारवाई केल्याने आज याबाबतची माहिती बाहेर येत आहे.

ठाण्यातही गेल्या महिन्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. एका महिलेला ओमान तसेच इतर आखाती देशात नोकरीचे आमिष दाखवत होती. तिने अनेक जणींना फसवल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. ऑनलाइन जॉब पोर्टलवर एका महिलेने जाहिरात पाहिली. त्यानंतर आरोपींनी तिला नोकरीचे आमीष दाखवले आणि तिची फसवणूक केली. ऑनलाइन जॉब पोर्टलवर पीडित महिलेने जाहिरात पाहिली आणि अर्ज केला होता. तिच्याशी आरोपी महिला आणि तिच्या साथीदारानी संपर्क साधला होता. तिला नंतर अनेक ऑफर्स देण्यात आल्या. तेव्हा ती आमिषांना बळी पडली. तिला गेल्यावर्षी ओमानला पाठवण्यात आले. काशिमीरा पोलीसांनी याबाबतची माहिती दिली होती.

ओमानला पोहोचल्यावर पीडित महिलेला एका बंगल्यात नेण्यात आले. तिथे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे तिला समजले. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिने ओमानला पाठवणार्‍या दोन एजंटशी संपर्क केला. नवी मुंबईमध्ये त्यांचे कार्यालय होते. तिथल्या दोन एजंटांनी तिला पाठवले होते. तिला पाठवण्यासाठी ओमानच्या सहकाऱ्यांकडून 3 लाख रुपये घेतल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने 1.65 लाख रुपयांची व्यवस्था केली आणि नंतर तिला 2022 ऑगस्टमध्ये भारतात येण्याची परवानगी देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.