मुंबई : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दक्षिण मुंबईतील एका घरात पोलिसांनी छापा टाकत 26 महिलांची सुटका केली ( Sex Racket Business In South Mumbai House ) आहे. या कारवाईत त्यांनी तीन महिलांसह चार जणांना अटक केली आहे. बुधवारी 22 डिसेंबरला पोलिसांनी कारवाईबाबतची माहीती दिली. एकाला ग्राहक म्हणून पाठवल्यानंतर विश्वसनीय माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने ( Social Service Branch Mumbai ) मंगळवारी लॅमिंग्टन रोड परिसरातील एका इमारतीमधील घरावर छापा टाकला.
तीन महिलांसह चार जणांना अटक : छाप्यादरम्यान, तीन महिलांसह चार जणांना पकडण्यात ( Four Including Three Women Arrested In Sax Racket ) आले. हे सर्व रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. कारवाई दरम्यान त्यांचे दहा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले, असे अधिकाऱ्याने सांगितले. परिसराची कसून झडती घेतल्यानंतर पोलिसांना घरातच गुप्त बांधलेली रूम आढळली. यात 26 महिलांना ठेवण्यात आले होते, असे त्यांनी ( 26 Women Kept In Secret Room ) सांगितले. त्यांची सुटका केल्यावर, विविध राज्यांतील महिलांनी पोलिसांना सांगितले की त्यांना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आले.
डीबी मार्ग पोलीस स्टेशनच्या ताब्यात : एसएसबीने अटक केलेल्या आरोपींना आणि सुटका केलेल्या महिलांना पुढील चौकशीसाठी डीबी मार्ग पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत आणि अश्लीलतेशी संबंधित गुन्ह्ये दाखल करण्यात आले आहेत.