ETV Bharat / state

Maha Budget 2023 : अर्थसंकल्पात सिंचनासाठी 'या' नव्या योजनांची घोषणा; जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू

शिंदे सरकारचा आज अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये सर्वच क्षेत्रांता भरीव तरतूद करण्याच्या दृष्टीने योजनांची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023) या अर्थसंकल्पात शिक्षण, महिला, अपंग, रोजगार यासह शेती आणि प्रामुख्याने सिंचनाकडेही लक्ष देण्यात आले आहे. फडणवीस यांनी सिंचन क्षेत्रातही भरघोस योजनांची घोषणा केली आहे.

Irrigation Scheme
Irrigation Scheme
author img

By

Published : Mar 9, 2023, 8:06 PM IST

Updated : Mar 9, 2023, 8:22 PM IST

मुंबई : शिवसेना-भाजप युती सरकारचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये सर्व क्षेत्रांसह सिंचन क्षेत्रालाही न्याय देणयात आला आहे. फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने सौरपंपनां बळकटी देण्यासाठी विविध घोषणा यामध्ये केल्या आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात वीजसंकट असते. त्या पार्श्वभूमीवर सौरपंपाना वीज जोडणी प्रकल्पासाठी योजना केली आहे. तसेच, इतर योजनांचीही त्यांना यामध्ये घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीज जोडणी :

  • वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
  • दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षात 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकऱ्यांना लाभ
  • पंतप्रधान कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
  • प्रलंबित 86, 073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
  • उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 लाख
  • पंतप्रधान 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
  • उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत

नदीजोड प्रकल्प :

  • दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
  • नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील पाणी वापरणार
  • मुंबई, गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
  • मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
  • वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ

तापी महापुनर्भरण प्रकल्प, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प

  • पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुर्भरण प्रकल्प
  • केंद्र सरकारकडे पाठपुरवठा करणार
  • कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ
  • या प्रकल्पासाठी 11, 626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता

सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार

  • गेल्या 8 महिन्यात 27 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा
  • चालू 268 पैकी 39 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार
  • पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार
  • बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करणार
  • गोसिखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी 1500 कोटी, जून 2024 पर्यंत पूर्ण करणार
  • कोकणच्या सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खाभूमी बंधाऱ्यांच्या कामांना गती

मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी

  • मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी
  • बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी
  • धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून पाणी

हर घर जल : पाण्यासोबत स्वच्छताही

  • जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांची तरतूद
  • जलजीवन मिशन, 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये
  • 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प
  • 10,000 कि.मी च्या मलजनवाहिनी
  • 4.55 कोटी मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया
  • 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने
  • ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे

5000 गावांमध्ये सुरू करणार जलयुक्त शिवार

  • जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये
  • गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ

हेही वाचा : Maha Budget 2023 : राज्यातील सर्व ज्योतिर्लिंगच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी

Last Updated : Mar 9, 2023, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.