मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली या ठिकाणी साई रिसॉर्ट हे हॉटेल आहे. आणि या संदर्भातल नियमबाह्य काम झाले. पर्यावरण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन त्यात केले; असा आरोप ठेवला गेला. त्यामुळेच खासदार किरोत सोमय्या यांनी गेल्या वर्षभरापासून याबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याबाबतची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती.आणि अखेर ईडीने एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू संजय कदम यांना अटक केली. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचा देखील संबंध आहे असा आरोप सोमय्या यांचा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरण राज्यात अनेक दिवसांपासून गाजत आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. 'ईडी'ने त्यांना ताब्यात घेतले. तसेच अनिल परब आणि कदम यांच्यात आर्थिक व्यवहार नियम बाह्य रीतीने झाला हा आरोप देखील केला आहे. त्यामुळे ईडी द्वारे अनिल परब यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर सदानंद कदम यांना चौकशी साठी अटक केली होती.
साई रिसॉर्ट हॉटेल बाबत कथित घोटाळा झालेला आहे. त्याचा अनिल परब यांनी स्वतःचा काही संबंध नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. तसे त्यांनी काल उच्च न्यायालयात याचिकेत हे सांगितले कलम 420 अंतर्गत जो गुन्हा दाखल झाला आहे. त्याला खालच्या न्यायालयाने नाकारले आहे. हा आधार घेत कालच अनिल परब यांच्या वकिलांनी एकाच घटनेत दोन गुन्हे कसे काय होऊ शकतात ;ही बाब न्यायालयात निदर्शनास आणली होती. त्या आधारावर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. मात्र परब यांचा व्यवहार संजय कदम यांच्याशी झाला.
हा व्यवहार कागदोपत्री झाल्यामुळे त्याचे सगळे दस्तावेज उपलब्ध आहेत असे देखील अनिल परब यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र तरीही ईडी ला संशय असल्याने चौकशी करणे अत्यावश्यक होते. याकरिता ईडीने त्यांना अटक केली;असा ईडीचा दावा आहे.
मात्र अंमलबजावणी संचालनालयाला साई रिसॉर्ट याबाबतचे बांधकाम हे बेकायदा असल्याचा संशय आहे .त्याबाबतची तक्रार त्यांच्याकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांनी कुडशी या गावी संजय कदम हे जे उद्योजक आहेत. त्यांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना मुंबईला ईडीच्या कोठडीमध्ये चौकशी करण्यासाठी तुरुंगवास मिळावा अशी मागणी मुंबईच्या सत्र न्यायालयाकडे केली. त्यानंतर ईडीच्या या विनंती अर्जावर न्यायालयाने 15 मार्चपर्यंत चौकशीसाठी कदम यांना तुरुंगात धाडलेल होते. आज मात्र ईडी ने पुन्हा अधिक काळासाठी तुरुंगवास हवा असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांनी 29 मार्च 2023 पर्यँत सदानंद कदम यांची कोठडी वाढवली.