ETV Bharat / state

Chhota Rajan : दाऊदच्या साथीदाराच्या हत्येच्या आरोपातून गँगस्टर छोटा राजनची दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा निर्णय

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( Underworld don Dawood Ibrahim ) टोळीतील कथित हस्तकाची 1999 मध्ये हत्या केल्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष MCOCA कोर्टाने गँगस्टर छोटा राजनला या प्रकरणातून दोषमुक्त ( Sessions court acquits gangster Chhota Rajan ) केले आहे. या प्रकरणात दोष मुक्त करण्यात यावे याकरिता छोटा राजनच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती.

Chhota Rajan
छोटा राजन
author img

By

Published : Dec 20, 2022, 10:38 PM IST

मुंबई : गॅंगस्टर छोटा राजनला सत्र न्यायलयाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( Underworld don Dawood Ibrahim ) टोळीतील साथीदाराची हत्या केल्याच्या आरोपातून दोष मुक्तता ( Sessions court acquits gangster Chhota Rajan ) केली आहे. या प्रकरणात दोष मुक्त करण्यात यावे याकरिता छोटा राजनच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने छोटा राजन ला या प्रकरणातून दोष मुक्त केले आहे. यावर मुंबई सत्र न्यायालयातील संकेतस्थळावर 10 पानाची सविस्तर ऑर्डर आज उपलब्ध करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( Underworld don Dawood Ibrahim ) टोळीतील कथित साथीदार अनिल शर्मा याला 2 सप्टेंबर 1999 रोजी उपनगरीय अंधेरी येथे छोटा राजनच्या साथीदारांनी गोळ्या मारून होत्या केली होती. अनिल शर्मा कथित पणे 12 सप्टेंबर 1992 रोजी येथील जे जे रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या टीमचा भाग होता. दाऊद टोळीने प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्याला मारण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप ( From the charge of killing Dawood accomplice ) आहे. दाऊद आणि राजन टोळ्यांमधील शत्रुत्वामुळे अनिल शर्माची हत्या झाली असा दावा फिर्यादी पक्षाने म्हटले आहे.

न्यायालयाने काय म्हटलंय : मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश ए एम पाटील यांनी आपल्या आदेशात नमूद केले की, फिर्यादीने तक्रारदाराने कथितपणे उच्चारलेले शब्द वगळता या अर्जदाराविरुद्ध तपास यंत्रणेने छोटा राजन विरोधात कोणताही ठोस पुरावे न्यायालयासमोर हजर करण्यात आले नाही आहे. आरोपपत्राचा अभ्यास केल्यावर या अर्जदारासह इतर आरोपींनी शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध नाही असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे. आरोप निश्चित करण्यासाठी पुरेशी पुरावे नसल्याने छोटा राजनला दोषमुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

राजन तिहार तरूंगात : 2015 मध्ये इंडोनेशियातील बाली येथून हद्दपार झाल्यापासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेला छोटा राजन इतर अनेक प्रकरणांमध्ये खटला चालवत आहे. पत्रकार जे डे हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.