ETV Bharat / state

सोशल मीडियावर महिला पोलीस कर्मचार्‍याचे बनावट अकाऊंट, अश्लील व्हिडिओ पोस्ट; गुन्हा दाखल - सोशल मीडिया महिला पोलीस कर्मचारी बनावट अकाऊंट

बनावट सोशल मीडिया अकाउंट काढून महिलांची बदनामी करण्याच्या घटना अलीकडे फार वाढले आहेत. यासंदर्भात पुणे शहरामध्ये अनेक तक्रारी दाखल आहेत. मात्र, आता महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

bibwewadi police station
बिबवेवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 26, 2021, 5:49 PM IST

पुणे - महिला पोलीस कर्मचार्‍याचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे बनावट अकाऊंट तयार करून त्यावर अश्लिल मेसेजेस आणि पोस्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे. ( Fake Account of Women Police Constable ) तसेच या माध्यमातून संबंधित महिलेच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -

बनावट सोशल मीडिया अकाऊंट काढून महिलांची बदनामी करण्याच्या घटना अलीकडे फार वाढले आहेत. यासंदर्भात पुणे शहरामध्ये अनेक तक्रारी दाखल आहेत. मात्र, आता महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Case filed in Bibwewadi Police Station )

हेही वाचा - Corona death rate : राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

काय आहे प्रकार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या नावाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर ( Social Sites ) त्यांचा फोटो वापरुन दोन बनावट अकाऊंट सुरू करण्यात आले. तसेच इन्स्टाग्रामवर दोन अकाऊंट सुरू करण्यात आले. त्यावर ‘पोलीस मी माझ्या नवर्‍याला सोडून दिले आहे. अ‍ॅटीट्युट गर्ल, माय लाईफ, माय चॉईस, माय मिस्टेक, बिल्लू इन माय सेल्फ” असे लिहून तसेच प्रोफाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. तसेच फिर्यादीच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश फिर्यादी यांनी पाठविले असल्याचे भासवून फिर्यादीची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.