मुंबई: निफ्टी व मुंबई शेअर बाजाराने सकाळच्या सत्रात बाजार खुला होताना आजवर्चा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला आहे. अमेरिकेतील बाजारपेठेतील सकारात्मकम स्थिती व विदेशी गुंतवणुकीचे वाढलेले प्रमाण यामुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली.
रिलायन्स इंस्ट्रीज आणि एचडीएफसीच्या शेअरची मोठ्या प्रमाण विक्री झाली. सकाळच्या सत्रात निर्देशांक 299.97 वाढून 63,716 वर पोहोचला. हा आजपर्यंतचा सर्वाधिक निर्देशांक राहिला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक 90.75 वाढून 18,908.15 वर पोहोचला.
या कंपन्यांचे वधारले शेअर- टायटन, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, लार्सन अँड टर्बो, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील आणि इन्फोसिसचे शेअर सर्वाधिक वाढले. त्यामुळे या कंपन्यांना चांगलाच फायदा मिळाला. तर टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक्नॉलीजल, पॉवर ग्रीड आणि एनटीपीसीचे शेअर घसरले आहेत.
कच्च्या तेलाच्या दरात किचिंत वाढ: जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.61 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 72.70 बॅरलवर पोहोचले आहेत. मंगळवारी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 2,024.05 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केल्याची माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीवरून दिसून येते. मंगळवारी मुंबई शेअर बाजार निर्देशांक 446.03 अंशाने वधारून 63,416.03 वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा 126.20 हा वाढून 18,817.40 वर पोहोचला होता.
मोदींच्या अमेरिका भेटीने आर्थिक संबंधाला चालना- जनरल अॅटॉमिक्सने बनवलेल्या MQ-9B सीगार्डियन ड्रोनच्या डीलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात चर्चा झाली. यानंतर भारत संरक्षण सामर्थ्य वाढविण्यासाठी MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. त्यामुळे भारताची टेहळणी यंत्रणा अधिक मजबूत होणार आहे. भारत आणि अमेरिकेने आर्थिक व राजनैतिक संबंध मजबूत करण्यासाठी संरक्षण, तंत्रज्ञान, मायक्रोचिप आणि व्हिसा नूतनीकरण यासह अनेक करारांची घोषणा केली. भारतातून अमेरिकेत जाण्यासाठीच्या व्हिसा नियमात शिथीलता आणण्यात येणार आहे. अमेरिकेने चीपचे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ व 6 जी तंत्रज्ञानात चीनला आव्हान देऊ शकणार आहे.