मुंबई : भटक्या श्वानाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी अजब सल्ला दिला आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवले पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. कडू यांच्या म्हणण्यानुसार, आसाममधील स्थानिक नागरिक श्वावाचे मास खातात. त्यामुळे श्वानांना आसामला पाठवायला हवे असे ते म्हणाले. आमदार प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर यांनी विधानसभेत भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान कडू बोलत होते.
आसाममध्ये भटक्या कुत्र्यांना मागणी : रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी हा प्रयोग सुरू करावा, अशी सूचना बच्चू कडू यांनी केली. आसाममध्ये भटक्या कुत्र्यांना मागणी आहे. यासाठी तेथील नागरिक ₹ 8 हजारापर्यंत खर्च करत आहेत. राज्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांना आसाममध्ये पाठवले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आमदारांच्या या वक्तव्यावर प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांची सुचना निंदनीय असल्याचे प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
मंत्री म्हणतात, सजेशन फॉर ॲक्शन : बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. या विधानावर प्राणी हक्क कार्यकर्ते आणि प्राणीप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला असून हे विधान अमानवी आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी सभागृहात या पद्धतीने केलेल्या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा आपत्ती न घेता, सजेशन फॉर ॲक्शन असे म्हटले आहे. यावर अजून वाद निर्माण झाला असून बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेशी सरकार सहमत आहे का? अशी विचारणा सुद्धा होऊ लागली आहे. तसेच महाराष्ट्रात श्र्वानांपासून मृतू पावणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले असून यासाठी सरकारने श्वान दत्तक योजना हाती घेतल्याचे पशुसंवर्धन मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केली होती लक्षवेधी : भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर बोलताना,आमदार प्रताप सरनाईक म्हणाले आहेत की, महाराष्ट्र मध्ये श्र्वानांपासून मृत्यू पावणाऱ्या लोकांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. अशा परिस्थितीमुळे शहरी भागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सकाळी व संध्याकाळी चालण्याचे मुश्किल होऊन बसले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी संध्याकाळी शाळेतून येताना व जाताना श्वान चावल्यामुळे अनेक बालकांचे मृत्यू झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये लक्षवेधी सूचना मांडली असता श्वान दत्तक योजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे. असं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. या योजनेमध्ये त्या त्या महापालिकेने जिल्हा परिषदेने व नगरपालिकेने श्वानांना ताब्यात घेऊन त्यांचे संगोपन व उपचार करावे. तसेच त्यांचे निर्विजन करावे. त्यांच्या आरोग्याचा खर्च महापालिकेने अथवा जिल्हा परिषदांनी करावा, असे सांगितले आहे. परंतु एकंदरीत या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी जो पर्याय सुचवला आहे, त्या पर्यायावर आता वाद निर्माण झाल्याने पुन्हा एकदा बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावर गदारोळ होणार यात शंका नाही.
उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठीत : याबाबतचे धोरण लवकरच तयार होईल, असे पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत धोरण ठरवले जाईल, असे सांगितले. जिल्हास्तरावरील जनावारांच्या जन्मदराचा मागोवा घेण्यासाठी आयोग स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उचलल्या जाणार्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठीत केली जाईल असे विखे पाटील यांनी सांगितले. या समितीमध्ये स्वयंसेवी संस्थांसहचा समावेश केला जाईल, असेही मंत्री म्हणाले. दरम्यान, झारखंडचे भाजप आमदार बिरांची नारायण यांनी नुकतेच नागरिंकावर हल्ले करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. जर राज्य सरकार या समस्येवर तोडगा काढू शकत नसेल तर, नागालँडच्या नागरिकांना बोलवा असे वक्तव्य त्यांनी केले होते.
मंत्री म्हणतात, सजेशन फॉर ॲक्शन : बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. या विधानावर प्राणी हक्क कार्यकर्ते आणि प्राणीप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला असून हे विधान अमानवी आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी सभागृहात या पद्धतीने केलेल्या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा आपत्ती न घेता, सजेशन फॉर ॲक्शन असे म्हटले आहे. यावर अजून वाद निर्माण झाला असून बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेशी सरकार सहमत आहे का? अशी विचारणा सुद्धा होऊ लागली आहे. तसेच महाराष्ट्रात श्र्वानांपासून मृतू पावणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले असून यासाठी सरकारने श्वान दत्तक योजना हाती घेतल्याचे पशुसंवर्धन मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केली होती लक्षवेधी : भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर बोलताना,आमदार प्रताप सरनाईक म्हणाले आहेत की, महाराष्ट्र मध्ये श्र्वानांपासून मृत्यू पावणाऱ्या लोकांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. अशा परिस्थितीमुळे शहरी भागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सकाळी व संध्याकाळी चालण्याचे मुश्किल होऊन बसले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी संध्याकाळी शाळेतून येताना व जाताना श्वान चावल्यामुळे अनेक बालकांचे मृत्यू झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये लक्षवेधी सूचना मांडली असता श्वान दत्तक योजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे. असं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. या योजनेमध्ये त्या त्या महापालिकेने जिल्हा परिषदेने व नगरपालिकेने श्वानांना ताब्यात घेऊन त्यांचे संगोपन व उपचार करावे. तसेच त्यांचे निर्विजन करावे. त्यांच्या आरोग्याचा खर्च महापालिकेने अथवा जिल्हा परिषदांनी करावा, असे सांगितले आहे. परंतु एकंदरीत या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी जो पर्याय सुचवला आहे, त्या पर्यायावर आता वाद निर्माण झाल्याने पुन्हा एकदा बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावर गदारोळ होणार यात शंका नाही.
हेही वाचा - Vivek Ramaswamy : वंश, लिंग आणि हवामानामुळे अमेरिका अडचणीत आली आहे - विवेक रामास्वामी