ETV Bharat / state

Park Selfie Point : पालिकेच्या उद्यानात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनल्या सेल्फी पॉईंट्स, शहीद तुकाराम ओंबळे मनोरंजन उद्यान - शहीद तुकाराम ओंबळे मनोरंजन उद्यान

'टाकाऊ पासून टिकाऊ' वस्तु तयार करण्याची संकल्पणा (Selfie points from waste to sustainable items) अनेकांनी राबविल्याचे आपण बघितले आहे. मात्र, चक्क (municipal park) पालिकेच्या उद्यानात तुटलेल्या झाडांच्या ओंडक्यापासुन मोटरसायकल आणि कार्टून्स बनवल्या गेल्याने, दहिसर (Dahisar) येथील शहीद तुकाराम ओंबळे मनोरंजन उद्यान (Shaheed Tukaram Omble Park) नागरिकांच्या आकर्षेनाचे केंद्र ठरले आहे.

Shaheed Tukaram Omble Park
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनल्या सेल्फी पॉईंट्स
author img

By

Published : Dec 4, 2022, 7:06 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळतात. पालिकेच्या उद्यानात (municipal park) अशाच प्रकारे जी झाडे कोसळतात, त्या झाडांपासून मोटरसायकल आणि कार्टून्स बनवले आहेत. 'टाकाऊ पासून टिकाऊ' तयार करणे, या उद्देशाने उद्यानात (Shaheed Tukaram Omble Park) असे सेल्फी पॉईंट (Selfie points from waste to sustainable items) बनवण्यात आले आहेत. याद्वारे बच्चे कंपनी आणि पर्यटकांना आकर्षित करण्याचा पालिकेचा विचार असल्याची माहिती, (Dahisar) पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनल्या सेल्फी पॉईंट्स

टिकाऊ सेल्फी पॉईंट : सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे उद्यानात जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. नागरिक आणि लहान मुलांना उद्यानात पुन्हा आनण्यासाठी पालिका आणि उद्यान विभाग नवनवीन उपक्रम राबवत आहे. यासाठी लोकसहभागातून वृक्ष संजीवनी अभियान, बालदिनाला मुलांच्या हस्ते वृक्षारोपण, आबालवृध्दांना नर्सरी प्रशिक्षण, उद्यानात मोफत वाचनालय असे अनेक कार्यक्रम उद्यान विभागामार्फत राबवले जातात. त्यानंतर आता 'टाकाऊ पासून टिकाऊ' अशी संकल्पना राबवून कोणताही अधिकचा खर्च न करता, विविध वस्तू निर्माण केल्या जात आहेत. उद्यानात टाकाऊ झाडांपासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंपासुन, बच्चे कंपनी आणि पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट विकसित झाले आहेत, असे परदेशी यांनी सांगितले.

Shaheed Tukaram Omble Park
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनल्या सेल्फी पॉईंट्स

दहिसर उद्यानात मोटरसायकल : दहिसर येथील शहीद तुकाराम ओंबळे मनोरंजन मैदानाचे क्षेत्रफळ १५ हजार ३१३ चौरस मीटर आहे. या मनोरंजन मैदानात रोज २५० ते ३०० पर्यटक भेट देतात. या मैदानात अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या असून; उद्यान खाते व बृहन्मुंबई पालिकेमार्फत पावसाळ्यात पडलेल्या वृक्षा पासून उद्यानात फिरायला येणाऱ्या लहान मुलांसाठी एक बाईक बनवून सेल्फी पॉईंट निर्माण केलेला आहे. एक महिन्यात ही बाईक निर्माण केली आहे. ही बाईक हॉर्न देते व त्यात लाईटही पेटतात. त्यामुळे दहिसर येथील शहीद तुकाराम ओंबळे मनोरंजन उद्यान चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे झाडापासून तयार केलेली ही बाईक बच्चे कंपनीसाठी सेल्फी पाॅईंट झाली असून, सगळ्यांचेच आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मुलांचे आवडते कार्टून्स : बोरिवली चंदावरकर रोड येथे श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान आहे. या उद्यानात एमपी थिएटर, जाॅगिग ट्रॅक, नर्सरी अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. तसेच उद्यानात लहान मुलांचे नेहमीच आकर्षण असणारे कार्टून्स या लाकडी ओंडक्यांपासून बनविण्यात आले आहेत. त्यामध्ये कोंबडा, ससा, अस्वल, घुबड, मांजर इत्यादी लहान मुलांचे आवडते प्राणी बनविण्यात आले आहेत. सध्या ही लाकडी कार्टून्स लहान मुलांचे आकर्षण ठरत आहेत. उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या लाकडाच्या ओंडक्यांचा वापर करून पालिकेचा एकही पैसा खर्च न करता नाममात्र साहित्याने ही कार्टून्स बनवण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.