मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली (Mumbai Crime Branch Action) आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 ने एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 80 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सौजन्या भूषण पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बनावट नोटा घेऊन एकजण येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच मुंबईतील पवई येथील आंबेडकर गार्डनजवळ, साकीविहार रोड येथे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी एक व्यक्ती दुचाकीवरून क्रमांक एमएच-48-एझेड-1576 लाल रंगाच्या बॅगसह पवई येथे संशयीतरित्या उभा असल्याचे दिसून आले. यावेळी पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेली बॅग चेक केली. यावेळी बॅगेत 500 रूपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा असल्याचे निर्दशनास आले. यावेळी पोलीसांनी अधिक तपासणी केली असता 500 रूपयांच्या नोटांचे 160 बंडल आढळून आले. या प्रत्येक बंडलमध्ये 500 रूपयांच्या 100 नोटा अशा एकूण 16000 नोटा आढळल्या (seized fake notes of Rs 80 lakh) आहे.
पोलीस चौकशी : भूषण पाटील या संशयित आरोपीविरोधात बनावट नोटा बाळगणे, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. यापूर्वी त्याने बनावट नोटा कोठे-कोठे खपवल्या आहेत ? याशिवाय त्याच्यासोबत यात आणखी कोण-कोण सहभागी आहे ? याची पोलीस चौकशी करत (person and seized fake notes) आहेत.
यापूर्वी क्रिकेट बुकींना अटक : क्राइम ब्रँचच्या खंडणी विरोधी सेलने एकूण 5 बुकींना अटक केली होती. यापूर्वी माटुंगा परिसरातून दोन क्रिकेट बुकींना अटक करण्यात आली होती. आता आणखी तीन बुकींना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले आरोपी पाकिस्तान, इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावत होते. हे आरोपी सट्टेबाजीतून कमावलेले पैसे हवालाद्वारे दुबईत बसलेल्या गुंडाकडे पाठवत असत, असा संशय गुन्हे शाखेला (Mumbai Crime Branch Unit 10) होता.
खंडणी विरोधी सेलचा छापा : अँटी एक्सटॉर्शन सेलच्या सूत्रांनी सांगितले की, फ्रान्सिस उर्फ विकी डायस, इम्रान अश्रफ खान, धर्मेश उर्फ धीरेन शिवदासानी, गौरव शिवदासानी, धर्मेश व्होरा अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले होते की, दादरमधील एका हॉटेलमध्ये काही लोक अंतिम सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती त्यांना गुप्तचरांकडून मिळाली होती, त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले आणि छापा टाकला. यादरम्यान गुन्हे शाखेने फ्रान्सिस इम्रान यांना हॉटेलच्या खोलीतून अटक केली (arrested accused person) होती.