ETV Bharat / state

मुंबईतही होऊ शकतो हिंसाचार, जमावबंदीचे आदेश जारी - हिंसाचार

दिल्लीत घडलेल्या हिंसाचारानंतर त्याचप्रकारचा हिंसाचार मुंबईत घडविला जाऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर विभागाने मुंबई पोलिसांना दिली. त्यावरुन 9 मार्चपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

बंदोबस्तातील पोलीस
बंदोबस्तातील पोलीस
author img

By

Published : Feb 29, 2020, 12:20 PM IST

मुंबई - दिल्लीत घडलेला हिंसाचार मुंबई सुद्धा घडवला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी यासंदर्भात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपली कंबर कसत मुंबईमध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्ती जमण्यास मनाई केलेली आहे. ही जमावबंदी 9 मार्च, 2020 पर्यंत राहणार असून या दरम्यान मुंबई पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

बंदोबस्तातील पोलीस

दिल्लीतील हिंसाचारा दरम्यान जाळपोळ मारहाण दगडफेक करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला होता. त्यापेक्षाही मोठा हिंसाचार मुंबई घडवला जाऊ शकतो, अशी सूचना गुप्तचर विभागाने दिली आहे. शिवाय मुंबईत सध्या अधिवेशन सुरू असून त्याच सीएए व एनआरसीविरोधात अनेक आंदोलने केली जात असल्यामुळे यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

अशा परिस्थितीत मुंबईत कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला आहे. यातून चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शासकीय कार्यालय यांना वगळण्यात आलेले आहे. याबरोबरच विवाह समारंभ व कौटुंबिक समारंभांना हे आदेश लागू नसणार असल्याचाही मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे. मुंबईतील विमानतळाजवळ कुठल्याही प्रकारचे ड्रोन, हलकी छोटी विमाने व लेझर लाईट चालवण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

हेही वाचा - मुंबईचे मावळते पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.