ETV Bharat / state

SC Order Indian Mother : भारतातील पत्नीने अमेरिकेत राहणाऱ्या पतीकडे 15 दिवसांच्या आत मुलाचा ताबा द्यावा- सर्वोच्च न्यायालय - सर्वोच्च न्यायालयाचा मुलाविषयी भारतीय आईला आदेश

SC Order Indian Mother About Child : एका भारतीय दाम्पत्याला अमेरिकेत बाळ झाले. मात्र, काही महिन्यानंतर बाळाची आई मुलाला घेऊन भारतात निघून आली. त्यामुळे मुलाचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. (Indian couple in America) न्यायालयानेही हा निकाल वडिलांच्या बाजूने दिला. मात्र, याला चिमुकल्याच्या आईने सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान दिले. (Petition to High Court for custody of child) यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आधीचा निकाल कायम ठेवत भारतातील आईने अमेरिकेत राहणाऱ्या पतीकडे 15 दिवसांच्या आत मुलाचा ताबा द्यावा, असे नमूद केले.

SC Order Indian Mother About Child
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 8:14 PM IST

मुंबई : SC Order Indian Mother About Child : मुंबईतला मुलगा ठाण्यातल्या मुलीसोबत लग्न करून अमेरिकेत गेला. अमेरिकेत त्यांना 2019 मध्ये मुलगा झाला. मुलाला नैसर्गिकरीत्या अमेरिकन राज्यघटनेनुसार अमेरिकन नागरिकत्व मिळाले. मात्र 2020 मध्ये कोणतेही कारण न सांगता आई मुलाला भारतात घेऊन आली. (Indian couple in America) त्यामुळे वडिलाने मुलाचा ताबा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये विशेष 'हेबीएस कॉर्पस' याचिका दाखल केली होती. (Petition to High Court for custody of child) त्या खटल्याच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी 15 दिवसात भारतातील आईने अमेरिकेतल्या बापाकडे मुलाचा ताबा द्यावा, असे आदेश दिले. मात्र या आदेशाला मुलाच्या आईने 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयांमध्ये आव्हान दिले. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला. परदेशी जाण्याबाबत पुढील आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडूनच प्राप्त करण्याचे देखील ह्या आदेश पत्रात नमूद केले.

मुलाला घेऊन आईला अमेरिकेत जावं लागेल : मुलाच्या आईने प्रतिवादी पक्षांना म्हणजे नवऱ्याच्या वकिलांना ईमेलद्वारे पत्र धाडलं आणि त्या पत्रामध्ये मुलाला घेऊन अमेरिकेत जाणार नाही, असा मजकूर लिहिला. त्यामुळे मुलाच्या बापाच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान आईला सांगितले की, तुम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावेच लागेल. तुमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. उच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी कायम ठेवलेला आहे. तुमचा व्हिसा तांत्रिक अडचणीचा भाग असेल तर तुम्ही त्याच्या नूतनीकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्ज करू शकता अशी मुभा देखील दिली.

काय आहे प्रकरण : 31 मार्च 2010 मध्ये मुंबईचा मुलगा व ठाण्यातली मुलगी यांनी लग्न केलं. नवरा अमेरिकेमध्ये सॅटॅलाइट इंजिनियर म्हणून काम करतो आणि बायको देखील अमेरिकेमध्ये नोकरी करत होती. त्यांना 2019 मध्ये बाळ झालं. मात्र, बाळ जन्माला येण्याआधी त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व ग्रीन कार्ड मिळालं होतं. परंतु, बाळ तिथे जन्माला आलं. त्याला अमेरिकन राज्यघटनेनुसार अमेरिकेचं नागरिकत्व नैसर्गिकरित्या जन्मामुळे प्राप्त झालं. यानंतर कौटुंबिक कलहामुळे बायकोने थेट भारत गाठले. ती सरळ आपल्या ठाण्याच्या घरी आली.

मुलाचे माझ्या बायकोनेच अपहरण केले : डिसेंबर 2020 मध्ये बायकोने नवऱ्याला ईमेलद्वारे कळवलं की, त्याने तिच्याशी संपर्क करू नये, तिला भेटू नये. नवरा भारतात आला होता आणि मुलाचा वाढदिवस साजरा करणार होता. परंतु, बायकोने असा ईमेल केल्यामुळे नवऱ्याने ठाणे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये नवऱ्याने म्हटले की, अमेरिकन नागरिकत्व असलेल्या माझ्या मुलाचे माझ्या बायकोनेच अपहरण केलेले आहे. या संदर्भात अमेरिकन दूतावास भारतात आणि अमेरिकेतील भारत दूतावास येथे तक्रार देखील बापाकडनं केली गेली.

तर अमेरिकेत जावेच लागेल : तक्रारीला दाद मिळत नसल्याने नवऱ्याने बायकोविरुद्ध 'हेबिएस कॉर्पस' याचिका 2020 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. दिल्लीचे निष्णात वकील परजित जोहर यांनी नवऱ्याची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे जोहर हे खास या खटल्यासाठी मुंबईत सातत्याने येत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे तर अमेरिकेत जावेच लागेल. मात्र, आई तयार नव्हती. उच्च न्यायालयात व्हिसा नूतनीकरण नाही हे कारण आज तिने दिले. तेव्हा उच्च न्यायालयाने ताबडतोब व्हिसा नूतनीकरण करिता न्यायालयात अर्ज उद्या सादर करावा असे आदेश दिले.

हेही वाचा:

  1. SC Hearing on Shivsena : शिवसेना पक्ष अन् चिन्हावर 'सुप्रीम सुनावणी'; पाहा काय म्हणाले घटनातज्ज्ञ
  2. Asim Sarode On Manipur Violence : महिलांना विवस्त्र केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय समिती नेमण्याची शक्यता - असीम सरोदे
  3. Congress Celebration For Rahul Gandhi: राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; काँग्रेसकडून पुणे, मुंबईत जल्लोष साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.