ETV Bharat / state

Saraswati Vaidya Murder Case : मनोज सानेला होती सेक्सची चटक; सरस्वतीच्या मृतदेहासोबत काढले होते नग्न फोटो

ठाण्यातील मीरा रोड येथील हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्याकांडातील आरोपी मनोज सानेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनोजने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या केली. पोलिसांना तपासात आढळले की, सरस्वती वैद्यची हत्या करणारा आरोपी मनोज साने अनेक डेटिंग ॲपवर सक्रिय होता. तो या माध्यमातून अनेक मुलींशी बोलायचा. याबद्दल विचारले असता हो, मी विकृत समजा, असे उत्तर त्याने पोलिसांना दिले.

Saraswati Vaidya Murder Case
मनोज सानेला होती सेक्सची चटक
author img

By

Published : Jun 15, 2023, 9:14 PM IST

Updated : Jun 15, 2023, 9:55 PM IST

मुंबई : सरस्वती वैद्यची निर्घृण हत्या करणारा आरोपी मनोज साने डेटिंग अँपद्वारे मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे, सरस्वती आणि साने यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणातूनच सरस्वतीची हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. मात्र, त्याने सरस्वतीची नेमकी हत्या कशी केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस तपासात मनोज साने याने तो नपुंसक असल्याचा तसेच त्याला दुर्धर आजार असल्याचा केलेला दावा खरा आहे की खोटा, हे तपासण्यासाठी नया नगर पोलिसांची टीम सानेला घेऊन जे जे रुग्णालयात दाखल झाली आहे. सलग दोन ते तीन दिवस मनोज सानेची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली.

साने हा सेक्सच्या आहारी गेला होता : मनोज साने सेक्सच्या आहारी (सेक्स ऍडिक्ट) होता. तो सतत अश्लील संकेतस्थळावर सक्रिय होता, असेही तपासात आढळले आहे. मीरा रोड येथील सरस्वती वैद्यच्या हत्या प्रकरणात आठवडया नंतरही अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. मनोज साने 'हॅजल', 'ओके क्युपिड' अशा डेटिंग ॲपवर सक्रिय होता. त्यातून तो अनेक मुलींच्या तो संपर्कात होता. हे समजल्यामुळेच सरस्वती आणि मनोज साने यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणातूनच तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोज साने हा सेक्सच्या आहारी गेला होता. तो सतत अश्लील संकेतस्थळांना भेटी देत असायचा. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील फोटो सापडले आहे.

मनोज साने यानेच केली हत्या : सरस्वतीने आत्महत्या केल्याचा सानेचा दावा पोलिसांना मान्य नाही. मनोज साने यानेच तिची हत्या केली आहे. मात्र नेमकी हत्या कशी केली याचा तपास करत आहेत, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले.

चाकूला धार आणि करवतीची दुरुस्ती : सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साने याने विद्युत करवत आणि चाकूचा वापर केला होता. हत्या केल्यानंतर त्यांनी चाकूल धार लावून आणली होती. मृतदेहाचे तुकडे करत असताना विद्युत करवतीची साखळी निघाली होती. त्यामुळे ती त्यांने दुरूस्तीला टाकली होती, असे पोलिसांनी सांगितले. सानेच्या घरातून पोलिसांनी कीटकनाशक जप्त केले आहे. हे कीटकनाशक पाजून सरस्वतीची हत्या केली असावी का? याचा तपास पोलीस करत आहे. तर जे जे रुग्णालयातून मृतदेहाच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत.

सरस्वती जगत होती एकाकी आयुष्य : सरस्वती वैद्य एकाकी आयुष्य जगत होती. ती कुणाच्याच संपर्कात नसायची. ती साने व्यतिरिक्त कुणाला ओळखत नव्हती, तिला कोण ओळखतही नव्हते. तिच्या बहिणीना साने संपर्क करू देत नव्हता. ती दिवसभर घरातच एकटीच असायची. या काळात तो ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाली होती. तिचा मोबाईल सानेच वापरायचा.

उद्या पुन्हा वैद्यकीय चाचणी : मनोज सानेने त्याला एचआयव्हीची लागण असल्याचे तसेच तो नपुंसक असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्याच्या या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी गुरुवारी त्याची पुन्हा वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

मृतदेहासबोत नग्न सेल्फी काढले : मनोज साने याला मद्यपान आणि धूम्रपान ही दोन्ही व्यसने आहेत. तसेच मनोज साने सेक्सच्या आहारी (सेक्स ऍडिक्ट) होता. तो सतत पॉर्न संकेतस्थळावर सक्रिय होता, असेही तपासात आढळले आहे. मनोज इतका विकृत होता की, त्याने 4 जूनला सरस्वती वैद्यची हत्या करून, तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्याआधी नग्न सेल्फी काढले आहेत. हे सेल्फी मनोज सानेच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापडले आहेत. मनोज सानेने सरस्वतीच्या मृतदेहाचे इतके तुकडे केले की, फॉरेन्सिक तज्ञ आणि डॉक्टरांना तिची हत्या नेमकी कशी केली हे शोधणे कठीण झाले आहे. त्यामुळे इतर राज्यातील फॉरेन्सिक तज्ञांची मदत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी भेटली माहिती : मनोज सानेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी त्याच्या किचनमध्ये एका पातेल्यात मास आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला विचारणा केली. सानेने माझ्या मित्राची बहीण राहत असून तिने हे मटण पाठवून दिले असल्याची बतावणी केली. मात्र, पोलिसांना सरस्वतीच्या मृतदेहाचे इतर अवशेष किचनमध्ये सापडल्यानंतर सानेची पोल खोल झाली. त्याचप्रमाणे मनोज सानेच्या घरात पोलिसांना कीटकनाशक भरलेली बाटली सापडली. सानेने सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर मी भयभीत झाल्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असल्याची बतावणी स्वतःच्या बचावासाठी सानेने केली असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तसेच सरस्वती वैद्यची हत्या मनोज साने यानेच केली असून, त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केल्याचे अनेक पुरावे पोलिसांकडे आहेत. वज्रेश्वरी येथील मंदिरात जाऊन मनोज साने आणि सरस्वती वैद्य या दोघांनी लग्न केले. सरस्वती वैद्यच्या थोरल्या बहिणीच्या लग्नातील सरस्वतीचा फोटो देखील पोलिसांना सापडला आहे. मनोज सानेच्या मोबाईलमध्ये पोलिसांना महिलांचे अश्लील फोटो आढळून आल्या आहेत.

डेटिंग ॲपवर सक्रिय होता : मीरा रोड येथील सरस्वती वैद्यच्या हत्या प्रकरणात आठवडया नंतरही अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. मनोज साने 'हॅजल', 'ओके क्युपिड' अशा डेटिंग ॲपवर सक्रिय होता. तसेच त्यातून तो अनेक मुलींच्या तो संपर्कात होता. हे समजल्यामुळेच सरस्वती आणि मनोज साने यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणातूनच तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोज साने हा सेक्सच्या आहारी गेला होता. तो सतत अश्लील संकेतस्थळांना भेटी देत असायचा. त्याच्या मोबाईल मध्ये अनेक अश्लील फोटो आढळून आले आहे.

हेही वाचा -

  1. Saraswati Vaidya Murder Case मनोज साने आणि सरस्वतीने मंदिरात केले होते लग्न बहिणीचा दावा
  2. Mira Road Murder श्रद्धा वालकरपेक्षा भयानक सरस्वती वैद्य हत्याकांड शंभरहून अधिक तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले
  3. Mumbai Crime News त्या खून प्रकरणामागे लव्ह सेक्स अन् धोकाप्रियकर झाला हैवान

Last Updated : Jun 15, 2023, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.