ETV Bharat / state

Sanjay Raut Letter : 'मी पुन्हा माघारी येईन', शिवसेना खासदार संजय राऊतांचे आईला भावनिक पत्र - Sanjay Raut Letter

Sanjay Raut Letter : आई ही शेवटी आईच असते हे संजय राऊत यांनी कारागृहातून देखील दाखवून दिले आहे. संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिले आणि ते ट्विटरवर पोस्ट केले ( Sanjay Raut Emotional Letter To Mother ) आहे. त्या पत्रातून त्यांनी आपल्या आईला 'मी नक्की परत येईन', असे आश्वासन दिले ( I will definitely come back ) आहे.

Sanjay Raut Letter
Sanjay Raut Letter
author img

By

Published : Oct 12, 2022, 3:43 PM IST

मुंबई : Sanjay Raut Letter : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ( Patra Chawl Scam ) ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेचे खासदार सध्या न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात ( ED Arrested Sanjay Raut ) आहेत. गेल्या अनेक दिवस संजय राऊत आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून जामिनासाठी प्रयत्न करत ( Sanjay Raut In Arthur Road Jail ) आहेत. मात्र, आई ही शेवटी आईच असते हे संजय राऊत यांनी कारागृहातून देखील दाखवून दिले आहे. संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिले आणि ते ट्विटरवर पोस्ट केले ( Sanjay Raut Emotional Letter To Mother ) आहे. त्या पत्रातून त्यांनी आपल्या आईला मी नक्की परत येईन असे आश्वासन दिले ( I will definitely come back ) आहे.

पत्रात काय लिहिलं संजय राऊतांनी : खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज सामना’साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौन्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौन्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली. आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय.रविवारी (१ ऑगस्ट) ‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे वसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच तू आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये म्हणालीस. खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज ‘सामना’त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता.

मी नक्कीच परत येईन : आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही कायर भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला तेव्हा “काहीतरी करा, शिवसेना वाचवा!” असे सांगणारी तूच होतीस. “हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं?” असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारीत होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच.

Sanjay Raut Letter
संजय राऊचांते आईला भावनिक पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.