मुंबई - महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात शिवसेना भाजपमधील संघर्ष इर्षेला पेटला आहे. अशातच शिवसेनेचे शिष्टमंडळ आज (सोमवार) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद येथे तर युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी कोकणात जाऊन ओल्या दुष्काळाची पाहणी केली. त्या पार्श्वभूमीवर तसेच सत्ता स्थापनेबाबत ही भेट असण्याची शक्यता आहे. मात्र, नेमकी राज्यपालांची भेट कशासाठी घेतली जाणार आहे, याबाबत शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे शेतकऱ्यांना आमचं सरकार आल्यास सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले आहे. तसेच शेतकरी व दुष्काळ मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यपालांच्या भेटीत यापूर्वी शिवसेनेने राज्यपालांना ओला दुष्काळ घोषित करावा, असे निवेदन दिले होते.