ETV Bharat / state

सक्षम विरोधी पक्षासाठी संजय राऊत यांनी दिल्या शुभेच्छा

लोक पावसात ही मतदान करत आहेत. महायुतीच्या बाजूने लोक मतदान करतील. विरोधी पक्ष टिकला पाहिजे. आमच्या समोर एक उत्तम विरोधी पक्ष असावा, विरोधी पक्ष असेल तर सत्ताधाऱ्यांवर वचक रहातो.

author img

By

Published : Oct 21, 2019, 12:39 PM IST

Updated : Oct 21, 2019, 5:14 PM IST

संजय राऊत

मुंबई - एकीकडे युतीचे सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करत दुरीकडे सक्षम विरोधी पक्ष हवा म्हणून विरोधी पक्षाला ही खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी संपूर्ण कुटुंबासह भांडुपमध्ये मतदान केले. या वेळी ते बोलत होते.

संजय राऊत

हेही वाचा- विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत भाजप आमदारांना ही राऊत यांनी टोला दिला. लोक पावसात ही मतदान करत आहेत. महायुतीच्या बाजूने लोक मतदान करतील. विरोधी पक्ष टिकला पाहिजे. आमच्या समोर एक उत्तम विरोधी पक्ष असावा, विरोधी पक्ष असेल तर सत्ताधाऱ्यांवर वचक रहातो. अधिक उत्तम प्रकारे काम केले जाते. त्यामुळे विरोधी पक्षाला ही शुभेच्छा देतो. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत पोलीस तपास सुरू आहे. त्यामुळे त्याचं राजकारण करणे योग्य नाही. या अगोदर भाजपच्या आमदारांनी ही अशीच महिलांबाबत वक्तव्य केली होती. त्यांच्या जागी आता धनंजय मुंडे आले आहेत, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:मुंबई |

एकीकडे युतीचे सरकार येणार असा विश्वास व्यक्त करत दुरीकडे सक्षम विरोधी पक्ष हवा म्हणून विरोधी पक्षाला ही खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुभेच्छा देत अप्रत्यक्षपणे मनसेच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला आहे. राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी संपूर्ण कुटुंबासह भांडुप मध्ये मतदान केले.या वेळी ते बोलत होते.Body:धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत भाजप आमदारांना ही टोला दिला.लोक पावसात ही मतदान करीत आहेत.महायुतीच्या बाजूने लोक मतदान करतील.विरोधी पक्ष टिकला पाहिजे. आमच्या समोर एक उत्तम विरोधी पक्ष असावा, विरोधी पक्ष असेल तर सत्ताधाऱ्यांवर वचक रहातो.अधिक उत्तम प्रकारे काम केले जाते.त्यामुळे विरोधी पक्षाला ही शुभेच्छा देतो.धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत पोलीस तपास सुरू आहे.त्यामुळे त्याचं राजकारण करणे योग्य नाही.या अगोदर भाजपच्या आमदारांनी ही अशीच महिलांबाबत वक्तव्य केली होती.त्यांच्या जागी आता धनंजय मुंडे आले आहेत.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Byte : संजय राऊतConclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.