ETV Bharat / state

Sanjay Raut : 2024 ला पुन्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री - संजय राऊत - 2024 ला पुन्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी '2024 पर्यंत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. मी बाहेर असो वा नसो शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचे रक्त वाया जाणार नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक हे देखील लवकरच बाहेर येतील.' असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

MP Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Nov 15, 2022, 3:51 PM IST

मुंबई : राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकांच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या निवडणुका विधानसभेच्या असतील की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हे मात्र अद्याप कोणत्याही पक्षाचा नेता स्पष्ट बोलत नाही. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी '2024 पर्यंत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. मी बाहेर असो वा नसो शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचे रक्त वाया जाणार नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक हे देखील लवकरच बाहेर येतील.' असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

खासदार संजय राऊत माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त करताना...

ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा नाही - कथित पत्राचार घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला. तब्बल 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांनी बाहेर आल्यावर देखील सकाळी माध्यमांशी बोलण्याची त्यांची प्रथा सुरू ठेवली आहे. आज विरोधकांचा समाचार घेताना खासदार राऊत म्हणाले की, "आज माझ्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते असतील अनेक नेत्यांचे सकाळपासूनच मला फोन येत आहेत. या सर्वांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो आहे. आपण जर मागच्या काही दिवसातले राजकारण पाहिले तर ते सूडबुद्धीने केले जात असल्याचे दिसून येईल. सध्याचा राजकारण हे गढूळ आहे. हे वातावरण अस्थिर आणि अविश्वासाचे आहे. या सूडबुद्धीच्या राजकारणाची रोज नवी उदाहरण समोर येत आहेत. ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा कधीच नव्हती, असे देखील राऊत म्हणाले.

हे थांबायला हवं - पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "मी असेल, तिकडे ठाण्यात जितेंद्र आव्हाड असतील यांच्यावर थोडे बुद्धीने खोटी प्रकरणं काढून कारवाया होत आहेत. अशातून कोणाला काय विकृत आनंद मिळतो काय मला माहित नाही. पण, हे थांबायला हवं. राज्यातील घडामोडी या राज्याचे प्रतिबिंब असतात या सर्वातून राज्य कुठे चालले हे दिसून येतं आणि त्यामुळे मी म्हणतोय हे सर्व थांबायला हवं. आणि पुन्हा एकदा स्वच्छ आणि निर्मळ महाराष्ट्र देशासमोर जगासमोर यायला हवा हीच आजच्या दिवशी मी स्वतःची आणि विचारांची प्रार्थना करतो."

2024 पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार - आज मला सकाळपासून अजित पवार, उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. माझ्या सुनावणीवेळी न्यायालयाने जी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यावरून सांगतो की नवबा मलिक, देशमुख सगळेच बाहेर येतील. चुकीच्या कारवाईबद्दल कोर्टाचे हातोडे पडत आहेत. लवकरत संपूर्ण आकाश निरभ्र होईल. शिवसैनिकाच्या प्रत्येक रक्ताचा हिशोब द्यावा लागणार. 2024 पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल. माझी लढाई संपलेली नाही, खोट्या कारवाया काय थांबणार नाहीत. माझा लढाही थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.