ETV Bharat / state

Sanjay Raut : संजय राऊत यांचे राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य, म्हणाले, 2024 मध्ये... - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut) यांनी राहुल गांधींबाबत (Sanjay Raut on Rahul Gandhi) मोठा दावा केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. राम मंदिराचा मुद्दा निकाली निघाला आहे, त्यामुळे त्यावर मत मागता येणार नाही, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच भारत जोडो यात्रेने (Sanjay Raut on Bharat Jodo Yatra) राहुल गांधींना एक वेगळी औळख निर्माण करून दिली आहे. हे वातावरण असेच राहिले तर 2024 मध्ये सत्ता बदल होईल, असे भाकीत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Sanjay Raut on Rahul Gandhi
संजय राऊत याचं राहुल बाबत मोठं वक्तव्य
author img

By

Published : Jan 1, 2023, 3:30 PM IST

Updated : Jan 1, 2023, 4:23 PM IST

मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Leader Sanjay Raut) यांनी राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Sanjay Raut on Rahul Gandhi ) गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेमुळे (Sanjay Raut on Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवे तेज आणि चमक मिळाल्याचा दावा संजय राऊत यांनी रविवारी केला. ते पुढे म्हणाले की, 2023 मध्येही हाच कल कायम राहिला तर पुढील लोकसभा निवडणुकीत देशात राजकीय बदल घडू शकेल.

2024 मध्ये सत्ता बदल होईल - संजय राऊत म्हणाले की, आशा आहे की 2023 मध्ये देश भयमुक्त' होईल, जे काही होत आहे ते सत्तेचे राजकारण आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी होऊन आपला उद्देश साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. ते पुढे म्हणाले की, 2022 या वर्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवी चमक आणि आशा दिली आहे. त्यामुळे 2024 मध्ये सत्ता बदल होईल, असे भाकीतही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

मोदी, शाहांवर टीका - संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, राम मंदिराचा मुद्दा निकाली निघाला आहे, त्यामुळे त्यावर मत मांडता येणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात की 'आपल्याला संकुचित मानसिकतेपासून दूर राहण्याची गरज आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत ही वृत्ती वाढली आहे.

लव्ह जिहादवर भाष्य - लव्ह जिहादच्या प्रकरणावरूनही संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'लव्ह जिहाद'चे हे शस्त्र निवडणुका जिंकण्यासाठी आणि हिंदूंमध्ये भीती निर्माण करण्यासाठी वापरले जात आहे का? त्यामुळे सर्वत्र लव्ह जिहादचा कोन शोधला जात आहे. अभिनेत्री तुनिषा शर्माचा मृत्यू आणि गेल्या महिन्यात श्रद्धा वालकरच्या हत्येचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, ही 'लव्ह जिहाद'ची प्रकरणे नाहीत. यासोबतच कोणत्याही समाजाच्या किंवा धर्माच्या महिलेवर अत्याचार होता कामा नये, असेही ते म्हणाले.

Last Updated : Jan 1, 2023, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.