ETV Bharat / state

भारतीय संघ फायनल जिंकला की म्हणताल मोदींमुळेच जिंकलो- संजय राऊत यांनी श्रेयवादावरून भाजपाची उडविली खिल्ली - Sanjay Raut takes jibe PM Modi

Sanjay Raut on Cricket World Cup 2023 Final : सध्या एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. तोच दुसरीकडे यावरुन आता राजकीय सामनाही रंगताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रेयवादावरून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविली आहे.

Sanjay Raut on Cricket World Cup 2023 Final

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 1:17 PM IST

मुंबई Sanjay Raut on Cricket World Cup 2023 Final : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडं सर्व जगाचं लक्ष लागलंय. या क्रिकेट सामन्यावरुन आता राजकीय सामनाही रंगू लागलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरुन भाजपावर घणाघाती टीका केलीय.

काय म्हणाले संजय राऊत : खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशात आता प्रत्येक गोष्टीचा राजकीय इव्हेंट केला जातोय. जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं ,तेव्हापासून एखाद्याचा मृत्यू झाला तरी त्याचा राजकीय इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेट सामना असला तरी त्याचा राजकीय इव्हेंट होतोय. आता भारतीय संघ फायनल जिंकला की मोदींमुळेच हा सामना जिंकला. अमित शाहच विकेटच्या मागं उभे राहून मार्गदर्शन करत होते, असा प्रचार भाजपकडून सुरू होईल. काल-परवापर्यंत हा खेळ होता, पण आता त्याचा राजकीय इव्हेंट करून टाकला आहे, अशी घणाघाती टिका संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केलीय.

पूर्वी मुंबई शहर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जात होतं. अशा प्रकारच्या खेळाचे इव्हेंट मुंबई, दिल्ली किंवा पश्चिम बंगालमधील ईडन गार्डन मैदानावर होत असत. मात्र आता मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबादमध्ये हलवण्यात आलंय. कारण त्यांना क्रिकेटचंही राजकारण करायचं आहे-खासदार संजय राऊत

ममतांनीही केली होती टीका : खेळाचं राजकारण होत असल्याचा आरोप करताना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपाकडून खेळात राजकारण आणलं जात असल्याचं सांगत त्यांनी भाजपावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, "आता सर्व काही भगवं होत आहे. आम्हाला आपल्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे. मला विश्वास आहे की ते विश्वचषक जिंकतील. पण जेव्हा भारतीय संघातील खेळाडू सराव करतात तेव्हा त्यांचा पेहरावही आता भगवा करण्यात आलाय. पूर्वी ते निळ्या रंगाचे कपडे घालायचे. आता मेट्रो स्टेशनलाही भगवा रंग दिला जात आहे, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टिका केली होती.

हेही वाचा :

  1. अंतिम सामन्यासाठी जगातील सर्वात मोठ्या मैदानावर दिग्गजांची मांदियाळी; पंतप्रधान, अमित शाह यांच्यासह 'हे' दिग्गज राहणार उपस्थित
  2. अंतिम सामन्यात भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी 'क्रिकेटचा देव' अहमदाबादेत, काय म्हणाला सचिन?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.