मुंबई : मणिपूरमध्ये ३ मे पासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. आता येथील चुरचंदपूर जिल्ह्यात हिंसाचार उसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील थोरबुंग भागात जोरदार गोळीबार सुरू आहे. हा परिसर सर्वात संवेदनशील मनाला जातो. राज्याच्या विधिमंडळासोबतच संसदेत देखील विरोधी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे आवाहन केले आहे. केंद्र सरकार मणिपूरविषयी असंवेदनशील असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व विरोधी पक्षांचे एक शिष्टमंडळ मणिपूरला जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
भारताच्या संसदेत चर्चा नाही : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत आपल्या निवास्थानी माध्यमांशी बोलताना या संदर्भात माहिती दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाकडून मणिपूरमधील हिंसाचार गांभीर्याने घेतला जात नाही. मणिपूरच्या हिंसाचारावार संसदेत कामकाज चालत नाही. युरोपच्या संसदेत यावर चर्चा होते. अमेरिकेत यावर चर्चा होते. अगदी युनोमध्ये चर्चा होते. पण, भारताच्या संसदेत यावर चर्चा होत नाही. पंतप्रधान संसदेत येवून या विषयावर निवेदन द्यायला तयार नाहीत. तिकडे जायला तयार नाहीत. यामागे त्यांचे काय राजकारण आहे, हे त्यांनाच माहिती, असे राऊत म्हणाले.
मणिपूरमधील सर्व धर्मियांशी चर्चा करणार : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, सरकारला या लोकांना भेटून प्रश्न सोडवायला वेळ नाही. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली देशातील विरोधी पक्षांचे एक शिष्ट मंडळ मणिपूरला जाणार आहे. यात शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत हे या शिष्ट मंडळासोबत मणिपूरला जाणार आहेत. आमचे हे शिष्टमंडळ तिकडे जाऊन मणिपूरमधील सर्व धर्मियांशी चर्चा करणार आहे. त्यांच्या मागण्या, प्रश्न तसेच हा हिंसाचार थांबवा, यासाठी उपाय काय करता येईल?
सगळ्या विषयावर स्थानिकांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर आम्ही संसदेत भूमिका मांडू आणि हा दंगा कसा थांबवता येईल यासाठी प्रयत्न करू-संजय राऊत
आम्ही तिन्ही पक्ष एकत्र : आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक आहे. मात्र, या बैठकीला उध्दव ठाकरे उपस्थित जाणार नाही, त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा आहेत. यावर खासदार राऊत म्हणाले की, आज जरी काँग्रेसची बैठक शरद पवार यांच्यासोबत असली तरी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा जाणार होते. पण, काही कारणास्तव ते तेथे जाणार नाहीत.
हेही वाचा :