ETV Bharat / state

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला - संजय राऊत

अजित पवार यांनी शरद पवारांना दगा दिला. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसले. अजित पवारांवर दबाव आणून त्यांना आणि आमदारांना फोडले आहे का? असा प्रश्न देखील संजय राऊतांनी उपस्थित केला.

संजय राऊत
author img

By

Published : Nov 23, 2019, 9:48 AM IST

Updated : Nov 23, 2019, 3:29 PM IST

मुंबई - अजित पवारांची हालचाली संशयास्पद होत्या. ते बैठकीमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता. वकिलाकडे बसलो होतो, असे सांगितले. आता ते कोणत्या वकिलासोबत बसले होते ते कळले आहे. यामध्ये शरद पवार यांचा कसलाही सहभाग नाही, असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला

अजित पवार यांनी शरद पवारांना दगा दिला. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसले. अजित पवारांवर दबाव आणून त्यांना आणि आमदारांना फोडले आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र सरकार स्थापनेचे LIVE UPDATES इथं बघा - LIVE महाराष्ट्रात राजकीय भूकंप

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडी तयार करत होतो. मात्र, अजित पवारांनी रात्रीच्या अंधरात डाका टाकला. रात्रीच्या पाप केले जाते, चोरी केली जाते. यांनी दिवसाच्या उजेडात शपथ का घेतली नाही, असे संजय राऊत म्हणाले. शरद पवार यांना या वयात अजित पवारांनी दगा देण्याचा प्रयत्न केला आहे, तो महाराष्ट्राला आवडलेला नाही. पडद्यामागे पैसा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप देखील संजय राऊतांना केला. राज्यातील जनता हे पाप धुऊन काढल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

अजित पवार यांना शरद पवार यांची लोकप्रियता आवडत नव्हती. त्यामुळे अजित पवार यांनी भाजपसोबत वेगळा घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी अजित पवार यांची जागा तुरुंगात आहे, असे म्हणत होते. त्यांची धमकी भाजपने अजित पवार यांना दिली का? असा प्रश्न देखील त्यांनी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Intro:Body:

politics news

Conclusion:
Last Updated : Nov 23, 2019, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.