ETV Bharat / state

Sanjay Raut News: भाजपाच्या नावावर अयोध्येचा सातबारा नाही, अमित शाह यांनी माफी मागावी- संजय राऊत - संजय राऊत अमित शाह अयोध्या दर्शन

मत दिले तर मोफत रामल्लाचे दर्शन अन्यथा पैसे भरावे लागतील, असं वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. दुसरीकडं राज्यातील मुख्यमंत्री सहायता निधीचा पैसा आमदार निधीत वळता केला जात असल्याचा आरोपही खासदार राऊत यांनी केला.

Sanjay Raut News
Sanjay Raut News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 2:03 PM IST

Updated : Nov 15, 2023, 11:56 AM IST

मुंबई: मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपाला मत दिली तर जनतेला आयोजित रामलल्लाचे दर्शन दिले जाईल. जर मत दिली नाही तर तुम्हाला पैसे भरावे लागतील, असे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच प्रचारसभेत सांगितले. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, राम आणि अयोध्या मंदिर ही तुमच्या मालकीच्या आहे का? ते सर्वांचे आहे. ते मुंबईत निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले की, मतं न देणाऱ्यांना भाजपा परत पाठवणार का? ही गंभीर बाब आहे. याबाबत हिंदू संघटनांनी दखल घेतली पाहिजे. अनेक राज्यांमध्ये आम्हीही निवडणुका लढवल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही दोघांनी एकत्र प्रचार केला. पण महाराष्ट्राबाहेर आम्हाला कधीही युतीमध्ये भारतीय जनता पक्षाने सामावून घेतले नाही. त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार उभे केले. स्वाभिमानानं प्रचार केला असेही राऊत यावेळी म्हणाले

बच्चा बच्चा राम बोलेगा असं म्हणायचा ठेका भाजपाला कोणी दिला आहे. असंख्य रामसेवक यांचं त्याग आणि बलिदान आहे. भाजपाच्या नावावर अयोध्येचा सातबारा नाही. शब्द मागे घ्या आणि माफी मागा, असे आव्हान संजय राऊत यांनी अमित शाह यांना दिले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीचा गोंधळ- राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे हे आमदार आणि खासदार सहायता निधीमध्ये वळविलं जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. खोक्यामध्ये सहायता निधी घरी पोहोचवला जात आहे. खोक्यामध्ये सरकार टिकवण्यासाठी वापरले जात आहेत. आरोग्य विषयक निधी आता सरकारला मिळत नाही. खासगी कामासाठी मुख्यमंत्री सहायता निधी वळविला जात आहे. हेच भारतीय जनता पक्षाचे व्यापक धोरण असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आशिष शेलारांवर कडाडून टीका- मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की प्रफुल्ल पटेल, भावना गवळी आणि इकबाल मिरची यांच्याबाबत शेलार का बोलत नाहीत. शेलार यांना माझे नम्र आवाहन आहे की, त्यांनी आपली सुटलेली चड्डी सावरावी. तुमची चड्डी सुटलेली आहे. आधी नाडी नीट बांधा. मग इकबाल मिरची येणार का त्याच्यावर बोला, अशा शब्दात राऊत यांनी टीका केली. तुम्ही आमच्याकडचा घाण आणि कचरा तुमच्याकडे घेतला आहे. त्यामुळे तुमचा पक्ष डम्पिंग ग्राउंड झाला आहे. त्याच कचऱ्यावर तुम्ही लोळत आहात. कचऱ्यावर डुकरासारखे लोळत आहात. तुम्ही तो कचरा का साफ करत नाही? आमच्याकडे बोट दाखवू नका. तुम्ही डरपोक आहात, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यावर टीका केली.

हेही वाचा-

  1. Sanjay Raut vs Nitesh Rane : नितेश राणे-संजय राऊत टीका करताना 'कमरेखाली' घसरले, काढली एकमेकांची 'अंतर्वस्त्र'
  2. Sameer Wankhede Met Sanjay Raut: समीर वानखेडेंनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीचं कारण माहितेय का?

Last Updated : Nov 15, 2023, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.